{ Page-Title / Story-Title }

Review Marathi

सावट रिव्ह्यू – स्मिता तांबे यांच्या उत्कृष्ट अभिनयाने सजलेला थरारपट

Release Date: 05 Apr 2019 / Rated: U/A

Read in: English


Cinestaan Rating

  • Acting:
  • Direction:
  • Music:
  • Story:

Blessy Chettiar

लेखक-दिग्दर्शक सौरभ सिन्हा ने मुख्य कथानकाच्या जोडीला काही साइड ट्रॅक्स सुद्धा लिहले आहेत ज्यामुळे चित्रपट आणखी इंटरेस्टिंग होतो.

सावट च्या ट्रेलर ने चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण केली होती. स्मिता तांबे ने साकारलेली इन्स्पेक्टर अदिती देशमुख वेगवेगळ्या संकटांचा सामना करत शेवटी त्या खुना मागच्या रहस्यांचा उलगडा करते.

कठोर आणि हळव्या अश्या दोन्ही छटा असणारी भूमिका स्मिता तांबेंच्या वाट्याला आली आणि ती त्यांनी उत्तम निभावली आहे. संपूर्ण चित्रपटाचा भार त्यांच्या खांद्यावर होता असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

सौरभ सिन्हा लिखित-दिग्दर्शित सावट पाहताना तुमचे कान आणि डोळे सतत उघडे ठेवावे लागतात. महाराष्ट्रातल्या माळगीडे गावात सात पुरुषांनी आत्महत्या केल्या आहेत. सर्व पुरुषांचे शव झाडाला लटकलेले आढळले असून त्यांच्या शरीरावर 'मला जाळा' आणि 'न्याय' असे लिहले होते.

तपास सुरु झाल्यानंतर इन्स्पेक्टर देशमुख ला हळूहळू अनेक गोष्टींबद्दल माहिती मिळते. हे खून काळी जादू करणाऱ्या नंदिनी आणि तिच्या दोन जुळ्या (श्वेतांबरी गुप्ते ने दोन्ही भूमिका केल्या आहेत) मुलींनी केलेत असा गावकऱ्यांचा समज झाला म्हणून त्यांनी नंदिनी ला गावातून हाकलून लावले आणि गावाबाहेरच तिचा मृत्यू झाला. तिच्या दोन जुळ्या मुलीं पैकी (अधिरा आणि अशनी) एक गायब झाली असून एकीला गावकऱ्यांनी बहिष्कृत केले आहे.

अदिती देशमुख इन्स्पेक्टर अतुल (मिलिंद शिरोळे) आणि सीतांशू शरद यांच्या मदतीने या रहस्याचा उलगडा करतात. चित्रपटात घटना वेगाने घडतात त्यामुळे अगदी लक्षपूर्वक चित्रपट पाहावा लागतो.

चित्रपटात काही त्रुटी देखील आहेत. काही खून कसे झाले या रहस्याचा उलगडा चित्रपटाच्या शेवटी सुध्दा केलेला नाही. अंधश्रद्धा, वैज्ञानिक दृष्टीकोनाची आवश्यकता, स्त्री-सक्षमीकरण या सारखे महत्वाचे विषय चित्रपटात हाताळले आहेत.

चित्रपटात एक महत्वाचा सीन आहे. काळी जादू वापरते म्हणून बहिष्कृत केलेली एक स्त्री आपल्या घराबाहेर मानवी हाडं लटकवते जेणेकरून तिला घाबरून कोणी तिची इज्जत लुटायला तिच्या घरात शिरणार नाही.

चित्रपटाची सुरवात आशादायक नसली तरी इन्स्पेक्टर अदिती देशमुख त्या सात खुनांचे रहस्य उलगडायला गावी येताच चित्रपट इंटरेस्टिंग होतो. पार्श्वसंगीत थोडे कर्कश झाले आहे, त्याच बरोबर संकलन सुद्धा प्रभावी झाले नाही. तरीसुद्धा कथानक वेगाने पुढे जात असल्याने या तांत्रिक चुकांकडे दुर्लक्ष करू शकतो.

सावट हा पूर्णपणे स्मिता तांबेंचा चित्रपट आहे असे म्हणायला हरकत नाही. मिळालेल्या संधीचे त्यांनी सोनं केलं. वयक्तिक आयुष्यात होणाऱ्या घडामोडी आणि इनवेस्टीगेशन मुळे होणारी शारीरिक दमछाक या सर्वामध्ये सुद्धा चेहऱ्यावर शांत भाव ठेवून काम करणारी देशमुख यामुळे सावट आणखी भावतो. जर तुम्हाला रहस्यपट, थरारपट आवडत असतील तर सावट या आठवड्यासाठी एक चांगला ऑप्शन आहे.

Related topics

You might also like