{ Page-Title / Story-Title }

Review Hindi

हमीद रिव्ह्यू – एका लहान मुलाच्या नजरेतून काश्मीर प्रश्न मांडण्याच्या प्रयत्न

Release Date: 15 Mar 2019

Read in: English | Hindi


Cinestaan Rating

  • Acting:
  • Direction:
  • Music:
  • Story:

Keyur Seta

एजाज खान च्या हमीद मध्ये एका मुलाच्या कथेतून काश्मीर प्रश्न मांडला आहे.

काश्मीर जगातील सर्वात सुंदर प्रदेशां पैकी एक आहे. दुर्दैवाने त्याच्या विहंगमय निसर्ग सौंदर्या पेक्षा तिथल्या रहिवासी आणि सैनिकांमध्ये चाललेल्या संघर्षामुळे काश्मीर जास्त चर्चेत आहे.

आपण देशाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात राहून काश्मीरी खोऱ्यातल्या संघर्षाच्या फक्त बातम्या ऐकतो, पण आपल्याच निरपराध देशबांधवांचे रक्त सांडताना पाहून आपण त्याकडे दुर्लक्ष नाही करु शकत. तिथल्या रहिवाशांना साधे जीवन जगायचे आहे.

एजाज खानच्या हमीद मधून एका लहान मुलाच्या नजरेतून काश्मीर प्रश्न मांडण्याच्या प्रयत्न केला आहे.

गुलमर्ग च्या पायथ्याशी असलेल्या बुड्डरकोट या गावातली ही कथा आहे. रहमत अली (सुमित कौल) आपली पत्नी इशरत काझमी (रसिका दुग्गल) आणि मुलगा हमीद (तल्हा अरशद रेशी) बरोबर राहतो.

रहमत पोटापाण्यासाठी होडी बनवण्याचा व्यवसाय करतो. व्यवसायातून खूप पैसे मिळत नसले तरी त्याला त्याच्या कारीगिरीवर अभिमान आहे. त्यांच्या गावात नेहमी विद्रोही आणि सी आर पी एफ जवानांमध्ये चकमकी होत असतात.

एका रात्री रेहमत घरी येताना हमीदसाठी बॅटरी सेल्स घेऊन यायला विसरतो. तो पुन्हा सेल्स आणायला बाहेर जातो पण त्यानंतर त्याचा पत्ता लागत नाही. इशरत आपल्या पतीला शोधण्याचे खूप प्रयत्न करते पण शेवटी तिच्या पदरी अपयशच येते.

त्यावेळी हमीद आपल्या वडिलांच्या फोनवरून एक नंबर लावतो जो त्याच्या मते अल्लाह चा नंबर आहे. पण तो नंबर असतो सी आर पी एफ जवान अभय कुमार (विकास कुमार) चा. त्या दोघांमध्ये एक बंध निर्माण होतो. पण आता पुढे काय?

वरवर पाहिलं तर हमीद ही एका पुरुषाच्या बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या पत्नी आणि मुलावर त्याचा काय परिणाम होतो एवढी सोपी कथा आहे. जरी हे कथानक आपण या अगोदर इतर चित्रपटातून पहिले असले तरी काश्मीर च्या दुर्गम खेड्यात ही गोष्ट घडते त्यामुळे हा चित्रपट इतर चित्रपटांपेक्षा वेगळा आहे.

सिक्युरिटी फोर्स आणि विद्रोही यां मधील संघर्ष कल्पकतेने कोणाचीही बाजू न घेता दाखवला आहे. काश्मिरी खोऱ्यात तैनात केलेले सैनिक विद्रोह्यांच्या स्वतंत्र काश्मीर च्या मागणी बद्दल काय विचार करतात हे आपल्याला दोन सैनिकांच्या आझादी लिहलेल्या भिंतीवर मूत्रविसर्जन करतानाच्या सीनमधून दाखवून दिले आहे.

चित्रपटातून काश्मिरी खोऱ्यातल्या रहिवाश्यांबद्दल सहानुभूती दाखवली आहे. रहमत चे कुटुंब निर्दोष आहे तरी त्यांच्या वाट्याला हे दुःख आले आहे.

हा चित्रपट काश्मीर खोऱ्यातल्या राजकीय वातावरणावर भाष्य करतोच पण त्याच बरोबर अनोळखी व्यक्ती मधल्या भावनिक नात्यावर पण भाष्य करतो. हमीद आणि अभय यांच्यातला बंध हळुवार आणि नैसर्गिक वेगाने पुढे जातो. त्या दोघांमध्ये संवाद तुम्हाला भावुक करतात आणि कधीकधी तुमच्या चेहऱ्यावर हसू सुद्धा आणतात.

गुंतागुंतीचे कथानक असले तरी चित्रपटाची मांडणी अत्यंत सहज आणि साधी आहे त्यामुळे क्लायमॅक्स आधीचे काही सीन्स चित्रपटाच्या टोन पेक्षा वेगळे असल्याने तुमचा गोंधळ उडवतात. तरीही चित्रपटाचा शेवट मात्र गोड होतो.

चित्रपट इतर सर्व टेक्निकल डिपार्टमेंटमध्ये सुद्धा उजवा आहे. जॉन विल्मोर यांचे छायाचित्रण उत्कृष्ट आहे. काश्मीर खोऱ्यातले अप्रतिम निसर्गसौंदर्य त्यांनी आपल्या कॅमेऱ्यात खुबीने टिपले आहे. दुर्गम खेड्यातल्या छोट्याछोट्या पण महत्वाच्या गोष्टी सुद्धा त्यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केल्या आहेत. पार्श्वसंगीतसुद्धा चांगले आहे.

बालकलाकार तल्हा अरशद रेशी चा अभिनय तुमचे मन हेलावून सोडेल. त्याच्या अप्रतिम अभिनय कौशल्यामुळे चित्रपट मनाला भिडतो. त्याचा अभिनय आणि चेहऱ्यावरची निरागसता पाहून तुम्हाला त्याची काळजी वाटते.

रसिका दुग्गल, ज्यांना आपण नुकतेच मंटो (२०१८) मध्ये पाहिलं, त्यांनी सुद्धा इशरत काझमी च्या भूमिकेत अभूतपूर्व अभिनय केला आहे. त्या आपलं पात्र अक्षरशः जगल्या असे त्यांचा अभिनय पाहून वाटते. त्यांनी काश्मिरी लहेज्यातली हिंदीसुद्धा उत्तम निभावली आहे.

विकास कुमार चित्रपटात एका उग्र स्वभावाच्या जवानाच्या भूमिके मध्ये दिसतात, पण जसा चित्रपट पुढे जातो तसे आपल्याला त्या जवानाच्या व्यक्तिमत्वाची हळवी बाजू सुद्धा दिसते. सुमित कौल ने छोट्या भूमिकेत सुद्धा आपल्या अभिनयाने छाप सोडली आहे.

हमीद अगदी मोजक्या हिंदी चित्रपटां पैकी आहे ज्यात काश्मीर चे खरे रूप दाखवले आहे. विशाल भारद्वाज यांचे हैदर (२०१४) आणि पियुष झा यांचे सिकंदर (२००९) ही त्यातली दोन उदाहरणे.

वीसाव्या आंतरराष्ट्रीय मुंबई चित्रपट महोत्सवात हमीद चा प्रीमिअर झाला होता.

 

Related topics

You might also like