Review Hindi

गली बॉय रिव्ह्यू – झोया अख्तर दिग्दर्शित या आशावादी गोष्टीमध्ये रणवीर सिंगचा धमाका

Release Date: 14 Feb 2019 / Rated: U/A / 02hr 36min

Read in: English | Hindi


Cinestaan Rating

  • Acting:
  • Direction:
  • Music:
  • Story:

Shriram Iyengar

संगीताचा नवीन प्रकार, अंडरडॉग प्रकारातली कथा, आणि लक्ष वेधून घेणारं छायाचित्रण या सर्व गोष्टींमुळे धारावी अगदी आपल्यासमोर जिवंत उभी केली आहे.

आठवा जेव्हा तुम्ही पहिल्यांदा लेड झेपेलिनचे 'स्टेरवे टू हेवन' किंवा मोहमद रफींचे 'याहू!' अथवा रॉक ऑन!! (२००८) मधला गिटार सोलो ऐकला होता. झोया अख्तरचा गली बॉय पाहताना तुम्हाला अगदी तसेच वाटेल. कोणी कितीही निराशावादी असू दे, पण चित्रपट संपल्यावर 'अपना टाइम आयेगा' गुणगुणल्या शिवाय राहू शकणार नाही.

झोयाने उत्तम रीत्या हाताळलेल्या या चित्रपटात शहरातल्या नैराश्यपूर्ण जीवनातून जन्माला आलेला संगीताच्या नवीन प्रकाराशी आपली ओळख करून दिली आहे.

धारावीच्या झोपडपट्टीमध्ये राहणारा मुराद शेख चे वडील जेव्हा दुसरे लग्न करतात तेव्हा त्याला त्या झोपडीनुमा घरात राहणे आणखीनच कठीण होऊन जाते. यातून सुटका म्हणून तो कविता लिहतो अथवा त्याची गर्लफ्रेंड सफिना शी गप्पा मारण्यात वेळ घालवतो.

कॉलेज फेस्टिवलमध्ये त्याची भेट एमसी शेर (सिद्धार्थ चतुर्वेदी) शी होते. तो मुराद ला मुंबईच्या अंडरग्राउंड रॅप कल्चर शी ओळख करून देतो. पण त्याला ज्या वाटेवर चालायचे आहे त्या वाटेवर पावलोपावली काटे आहेत.

त्याच्या वडिलांच्या मते ग्रॅज्युएट होऊन नोकरी करणे म्हणजे तो आपल्या आयुष्यात यशस्वी झाला. पण मुराद ज्या श्रीमंत कुटुंबाकडे ड्राइवर म्हणून नोकरी करतो, ते आपल्या मुलीला सांगतात की आजकाल सर्वच ग्रॅज्युएट होतात, तुला पण याच्यासारखं फक्त ग्रॅज्युएट होण्यातच धन्यता मानायची आहे का?

न घाबरता मुराद त्याची लढाई चालूच ठेवतो आणि शेवटी एकदा स्काय (कल्की केकलां) च्या मदतीने तो स्टेजवर लोकांसमोर आपले टॅलेंट दाखवू लागतो.

तसं या अंडरडॉगच्या कहाणी मध्ये नावीन्य असे काही नाही. आपल्याला हे अगोदरच ठाऊक आहे की मुराद एक अतिशय टॅलेंटेड रॅपर आहे, हे ही ठाऊक आहे की लवकरच त्याच्या कुटुंबियांना देखील त्याच्या टॅलेंटचा अंदाज येतो, लव्हस्टोरी, गुरु-शिष्याची नवीन जोडी, एक गुन्हेगारी मार्गाला लागलेला मित्र आणि पावलोपावली असणारे काटे या सर्वच गोष्टी काही नवीन नाहीत.

परंतू हा चित्रपट आशावादाविषयी आहे. आशावाद ही जगातील कदाचित एकमेव सुंदर गोष्ट आहे.

झोया अख्तर यांची पटकथा थोडी लांबलचक असली तरी रोमहर्षक आहे. पण या कथेमध्ये जीव ओतलाय तो सर्व कलावंतांनी. गरीबी हेच ज्याच्या आयुष्याचं कटु सत्य आहे अश्या वडिलाची भूमिका विजय राज यांनी उत्कृष्ट निभावली आहे. विजय वर्मा यांनी मुरादच्या ड्रगच्या आहारी गेलेल्या मित्राच्या भूमिकेमध्ये उत्तम अभिनय केला आहे.

सिद्धांत चतुर्वेदी संपूर्ण चित्रपटात त्यांच्या अभिनयाने आपल्याला प्रभावित करतात. चित्रपट संपल्यावर देखील अनेकांच्या लक्षात ही भूमिका राहील. चतुर्वेदींचा नैसर्गिक अभिनय नक्कीच आपल्याला भुरळ घालतो.

मुरादची आई आफ्रीनच्या भूमिकेत अमृता सुभाष आणि आजीच्या भूमिकेत ज्योती सुभाष तसेच सफीनाच्या आईची भूमिका करणाऱ्या शीबा चड्ढा या सर्वच कलाकारांनी उत्कृष्ट अभिनयाचा नमुना दिला आहे. कल्की केकलां अगदी छोट्या पण महत्वपूर्ण भूमिकेमध्ये त्यांच्या अभिनयाने आपली छाप सोडून जातात.

जिद्दी आणि मत्त्वाकांशी सफिनाच्या भूमिकेत आलिया ला पाहणे ही एक पर्वणीच आहे. नुसतं डोळ्यातूनच खूप काही बोलून जाण्याची कला आलिया ला अवगत आहे आणि या चित्रपटात सुद्धा त्या हेच करतात.

मुराद हाच तिच्या आयुष्यातली एकमेव सुंदर गोष्ट आहे त्यामुळे तो आपल्यापासून दूर होतोय ही कल्पना सुद्धा तिला सहन होत नाही. जर रणवीर सिंग ने तगडा अभिनय केला नस्ता तर आलिया ने तिच्या अभिनयातून सर्व लाइमलाइट तिच्याकडेच वळवली असती इतका तिचा अभिनय प्रभावी आहे.

उगाच सैड गाणे वापरून अगदी टिपिकल फिल्मी पद्धतीचं ब्रेक-अप दाखवण्याचं टाळलं आहे. ब्रेक-अपचं सहन करण्यापलीकडे होणारं आणि ब्रेक-अप नंतर होणारा मानसिक त्रास या सर्व गोष्टी अगदी स्पष्टपणे चित्रपटात दाखवल्या आहेत. व्हॅलेंटाइन च्या दिवशी चित्रपट रिलीज होणे हा एक चांगला योगायोगच म्हणावा लागेल.

रणवीर सिंग यांचा संयत अभिनय हा चित्रपटाची सर्वात जमेची बाजू आहे. जेव्हा रणवीर सिंग त्यांच्या आतमध्ये धुमसणारा राग फक्त आपल्या डोळ्यातून व्यक्त करतात ते चित्रपटातील बेस्ट सीन्स आहेत.

आतमध्ये धूमसत असणारा राग बाहेर येऊ न देता अत्यंत शांत आणि मृदू भाषेत मुराद बोलतो. चित्रपटात असे खूप सीन्स आहेत ज्यात मुराद आपला राग आतमध्येच धुमसत ठेवतो आणि रॅपच्या माध्यमातून सगळा राग बाहेर काढतो.

रणवीर सिंग रॅप करण्यामध्ये आता इतके माहीर झालेत की ते खऱ्या आयुष्यात पण रॅप मध्ये करिअर करायचा विचार करू शकतात. प्रत्येक सीनमध्ये रणवीर सिंग इतक्या आत्मविश्वासाने वावरतात की तुमची त्यांच्यावरून नजरच हटत नाही.

पूर्ण चित्रपटात रॅप हे नदीच्या प्रवाहासारखं अगदी सहज वाहत चालला आहे. झोया अख्तर आणि रीमा कागती यांनी पटकथा अशीकाही लिहली आहे की त्यात रॅप हा कथेचा नैसर्गिक भाग वाटतो.

जय ओझा यांच्या कॅमेरावर्क ची पण स्तुती करणे आवश्यक आहे. त्यांचा कॅमेरा नेहमी नायकाच्या चेहऱ्यावर असतो. त्यांच्या कॅमेराच्या नजरेतून पाहिल्यास मुंबई हे एक आत्मा नसलेलं शहर आहे असं वाटतं. मुरादचा एकांत सुद्धा कॅमेरात हुशारीने टिपला आहे. चित्रपटाच्या सुरुवातीचा सीन ज्यात मुराद आपल्या गॅंग मेम्बर्स बरोबर कारचोरी करत असतो तो एक ट्रॅकींग शॉट आहे. प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी ही चांगली कल्पना आहे.

मुख्य प्रवाहातल्या संगीत क्षेत्रात असलेल्या गर्दीमुळे हे रॅपर्स स्वतःची जागा शोधण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे जागा हा या कथानकाचा एक महत्वाचा भाग आहे. जेव्हा मुराद पहिल्यांदाच एका मोठ्या बाथरूम मध्ये जातो तेव्हा सर्वात पहिल्यांदा त्याची नजर हे बाथरूम किती मोठे आहे याच्यावरच जाते.

बस असो ट्रेन असो अथवा त्यांचे छोटेसे घर असो, या सर्वांमधून कॅमेरा अगदी आक्रमकतेने फिरत असतो. संगीतसुद्धा तसेच आक्रमक आहे.

झोया अख्तर यांनी या अगोदर जिंदगी ना मिलेगी दोबारा (२०११) व दिल धडकने दो (२०१५) अश्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्या नेहमी श्रीमंत लोकांचे आयुष्य चित्रपटातून दाखवतात असा त्यांच्यावर आरोप केला जायचा. पण त्यांनी या चित्रपटातून सर्व टीकाकारांना चोख उत्तर दिले असं म्हणायला हरकत नाही.

या चित्रपटातून आताच्या संगीतक्षेत्रामध्ये असणारा तोचतोचपणा पासून आझादी मिळवण्याचा प्रयत्न केला आहे.

Related topics

You might also like