{ Page-Title / Story-Title }

News Marathi

टकाटक २ च्या आधी मिलिंद कवडेंच्या एक नंबरची घोषणा


दोन्ही प्रौढ विनोदी चित्रपटांप्रमाणेच या गूढ चित्रपटात प्रथमेश परब मुख्य भूमिकेत आहेत.

Our Correspondent

दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी नुकतेच टकाटक २ या त्यांच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले. टकाटक (२०१९) या प्रौढ विनोदी चित्रपटाचा हा सिक्वल चित्रपट आहे. मात्र सिक्वलच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्याआधीच कवडेंनी एक नंबर या त्यांच्या पुढील चित्रपटाची घोषणा केली आहे.

महेश शिवाजी धुमाळ, जितेंद्र शिवाजी धुमाळ आणि कवडे स्वतः या चित्रपटाचे निर्माते आहेत. धुमाळ प्रॉडक्शन्स आणि आऊट ऑफ द बॉक्स फिल्म्स या बॅनरखाली चित्रपटाची निर्मिती होत आहे. निर्मात्यांनी या चित्रपटाला रहस्यमयी कॉमेडी असे म्हटले आहे. चित्रपटाच्या रंगीबिरंगी शीर्षक पोस्टरवरून हमखास मनोरंजन मिळेल असे दिसतेय.

कवडे यांनी आपल्या निवेदनात म्हटले, "चित्रपटाच्या विषयाला न्याय देणारे शीर्षक चित्रपटाला असणे आवश्यक आहे. एक नंबर या नावावरून प्रेक्षकांना सुद्धा हा चित्रपट बघितल्यानंतर कळेल कि हे शीर्षक किती योग्य आहे ते. ज्या प्रकारे रहस्य आणि कॉमेडी या दोन्ही शैली या चित्रपटात मी हाताळल्या आहेत, त्यावरून मला विश्वास आहे कि प्रेक्षकांना हा चित्रपट नक्कीच आवडेल."

दोन्ही टकाटक चित्रपटांप्रमाणेच या हि चित्रपटात नायकाच्या भूमिकेत प्रथमेश परब दिसणार आहे. चित्रपटात मिलिंद शिंदे, गणेश यादव, निशा परुळेकर, अभिलाषा पाटील, आयली घिया, ऋषिकेश धामापूरकर, अक्षता पाडगावकर, प्रणाली संघमित्रा धावरे, सुमीत बोकसे, सुनील मगरे, हरीश थोरात आणि आकाश कोळी काम करत आहेत.

Related topics