{ Page-Title / Story-Title }

News Hindi

शी ट्रेलर – फसलेल्या अंडरकव्हर ऑपरेशनचा न्वार थ्रिलर


इम्तियाज अली लिखित या वेब-सीरीज मध्ये अदिती पोहनकर आणि विजय वर्मा मुख्य भूमिकेत आहेत.

Shriram Iyengar

नुकताच लव्ह आज कल (२०२०) सारखा रोमँटिक चित्रपट देणारे इम्तियाज अली नेटफ्लिक्सच्या शी या वेब-सीरीजमधून न्वार थ्रिलर सारख्या वेगळ्याच शैलीमधून समोर येत आहेत.

इम्तियाज अली लिखित या वेब-सीरीज मध्ये अदिती पोहनकर महिला हवालदारच्या भूमिकेत आहेत. मुंबईच्या नार्कोटिक्स साखळीला पकडण्यासाठी ती एका अंडरकव्हर ऑपरेशनचा भाग बनते. पण हे ऑपरेशन नंतर अचानक गूढ आणि भयंकर रूप घेतं.

ट्रेलरच्या सुरुवातीला विजय वर्मा यांचं पात्र नार्कोटिक्सच्या ड्रग साखळीबद्दल पोलिसांना सत्य सांगतोय. याच वेळेस मुंबईची भूमिका परदेसी (पोहनकर) हि हवालदार आपल्या समोर येते. एक वेश्या म्हणून तिला एका अंडरकव्हर ऑपरेशनसाठी निवडलं जातं. पण भूमिकासाठी हे करणं एवढं सोपं नाही. या ऑपरेशन दरम्यान ती स्वतःच्या मर्यादेपलीकडे काही मिळवते का आणि स्वतःला नव्याने ओळखायला लागते कि नाही हे या सीरीजमध्ये बघायला मिळेल.

नेटफ्लिक्सने वेब-सीरीज बद्दल दिलेल्या माहितीमध्ये असं लिहिलंय कि 'ड्रग साखळीला पकडण्यासाठी रचलेल्या एका अंडरकव्हर ऑपरेशन मध्ये मुंबईची एक महिला हवालदार तिचं स्वत्व मिळवते, जेव्हा तिला स्वतःच्या सुप्त लैंगिक क्षमतेची ओळख होते.'

२० मार्च पासून हि वेब-सीरीज नेटफ्लिक्सवर दाखवण्यात येईल.

Related topics

Netflix Trailer review