{ Page-Title / Story-Title }

News Marathi

हरिओम घाडगेंनी श्री हरी स्टुडिओज या बॅनरखाली आपल्या पहिल्या मराठी चित्रपटाची केली घोषणा


हरी ओम असे शीर्षक असलेल्या या चित्रपटाचे लेखन आशिष नेवलकर यांनी केले आहे आणि तेच हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहेत.

Suyog Zore

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी थांबली आहे. शूटिंग आणि चित्रपट प्रदर्शन तसेही पुढच्या सूचनेपर्यंत थांबले आहे. पण चित्रपट घोषणा मात्र थांबलेल्या नाहीत.

निर्माता हरिओम घाडगे यांनी त्यांच्या पहिल्या मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. चित्रपटाचे शीर्षक हरी ओम आहे आणि श्री हरी स्टुडिओज या बॅनरखाली चित्रपटाची निर्मिती केली जात आहे. चित्रपटाचे लेखन अभिनेते आशिष नेवलकर यांनी केले आहे आणि तेच हा चित्रपट दिग्दर्शित करत आहेत. दिग्दर्शक म्हणून हा त्यांचा पहिलाच चित्रपट आहे.

घाडगे यांनी १२ मार्च रोजी शिवजयंतीचे औचित्य साधून या प्रोजेक्टची घोषणा केली. रायगड जिल्ह्यातील उमरठ येथे तानाजी मालुसरेंच्या घराच्या जिर्णीद्धाराचा पाया ठेवून त्यांनी हि घोषणा केली.

शिवाजी महाराजांचे सुभेदार तानाजी मालुसरे यांना सिंहगड येथील युद्धात वीर मरण आले. त्यांच्या त्यागाला स्मरून कोंढ़ाना किल्ल्याचे नाव बदलून सिंहगढ ठेवण्यात आले होते. जानेवारीत प्रदर्शित झालेला तान्हाजी – द अनसंग वॉरिअर (२०२०) चित्रपट तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित होता.

हरिओम घाडगे आणि त्यांच्या चित्रपटाच्या टीमने उमरठ गावातील लोकांच्या साथीने तानाजी मालुसरेंच्या घराच्या पुनर्बांधणीची पायाभरणी केली. त्यानंतर त्यांनी आपल्या आगामी चित्रपटासाठी पूजा आयोजित करून संहितेचे पूजन केले.

चित्रपटाच्या दिग्दर्शकाशिवाय इतर कलाकार किंवा तंत्रज्ञाविषयी आणि चित्रपटाच्या कथेविषयी कुठलीही माहिती अजून देण्यात आलेली नाही.

Related topics