{ Page-Title / Story-Title }

News Hindi

'आय एम अ डिस्को डान्सर २.०' सिंगल – मिथुनदांच्या जादूला पुढे नेताहेत टायगर श्रॉफ


सलीम-सुलेमान यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याला बेन्नी दयाल यांनी सादर केले आहे. श्रॉफ यात आधुनिक आणि कसरती शरीरात दिसतात.

Shriram Iyengar

कोरोना व्हायरसमुळे बागी ३ या चित्रपटाला फटका बसला असेल. मात्र टायगर श्रॉफ यांची गाडी कुठेही थांबलेली नाही. 'आय एम अ डिस्को डान्सर २.०' या सिंगल मध्ये श्रॉफ मिथुन चक्रवर्ती यांनी अजरामर केलेले गाणे नव्याने त्यांच्या अंदाजात आणले आहे. डिस्को डान्सर (१९८२) या चित्रपटातील मूळ गाण्याचे हे नवीन व्हर्जन आहे. बेन्नी दयाल यांनी हे गायले असून सलीम-सुलेमान यांनी गाणे संगीतबद्ध केले आहे. बॉस्को मार्टीस यांनी गाण्याची कोरिओग्राफी केली आहे.

दृश्यांकनात जुने आणि नवीन गाणे पूर्णपणे वेगळे आहे. मिथुन चक्रवर्ती मूळ गाण्यात ओरिजिनल डिस्को डान्सर अवतारात चमचमत्या लायटिंगमध्ये आणि गिटार, हेडबँड सोबत दिसले होते, तर इथे श्रॉफ आधुनिक आणि कसरती शरीरात दिसताहेत. मूळ गाण्यात एक नवेपण आणि थोडे नवखेपण सुद्धा होते, ज्यामुळे ते अधिक लोकप्रिय झाले होते, तर नव्या गाण्यात सगळ्या गोष्टी सराईतपणे मांडलेल्या दिसतात. दृश्यांकनात हे गाणं नक्कीच पुढे आहे. पण मिथुनदांची अदा आणि बिनधास्तपणा याच्याशी तुलना केली तर संपूर्ण वेगळा मुद्दा होईल.

श्रॉफ उत्तम डान्सर आहेत, यात काहीच शंका नाही. परंतु बॉस्को मार्टीस यांच्या कोरिओग्राफीमध्ये त्यांच्या कौशल्याला फारसा वाव मिळाला नाहीय. ह्रितिक रोशन यांच्या काही चित्रपटांच्या गाण्यातील स्टेप्स इथे बघताना तुमच्या चेहऱ्यवरही हलकेसे हास्य पसरेल.

गाण्याचे संगीत मूळ गाण्याशी प्रामाणिक राहूनच केलं गेलंय. सलीम-सुलेमान यांनी भारी परकशनचा वापर केलाय आणि डिस्को पेक्षा ईडीएम (इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक) चा वापर अधिक केलाय. डीजेंच्या लिस्टवर मात्र हे गाणं नक्की असेल, यात शंका नाही.

टायगर श्रॉफ यांनी गाण्याला अनुसरून डान्स केला आहे. त्यांचा डान्स बघण्यापेक्षा करून त्याचा आनंद घ्यावा अशा स्टेप्स त्यांना देण्यात आल्या आहेत. बेन्नी दयाल यांनी आवाजाचा पोत वाढवून मूळ गायक विजय बेनेडिक्ट यांच्या आवाजाच्या वजनापर्यंत पोहचण्याचा आणि सलीम-सुलेमान यांच्या भारी बीटच्या संगीताला साजेसा आवाज देण्याचा प्रयत्न केलाय.

पण मूळ गाणे तुमचे अधिक मनोरंजन करते, ज्यात तुम्हाला मिथुनदा यांची अजरामर स्टाईल बघायला मिळते.

 

Related topics