{ Page-Title / Story-Title }

News Marathi

ईमेल फिमेल ट्रेलर – निखिल रत्नपारखी यांचा नो एंट्री प्रयत्न फसला


ट्रेलर वरून लक्षात येतं कि हा बी ग्रेड प्रकारातला चित्रपट आहे.

Keyur Seta

मराठी आणि कधी कधी हिंदी चित्रपटांत अभिनेते निखिल रत्नपारखी यांनी एक उत्तम चरित्र अभिनेता म्हणून गेल्या काही वर्षात नाव कमावले आहे. गोळा बेरीज या चित्रपटात त्यांनी पहिल्यांदाच नायकाची भूमिका केली, ज्यात त्यांनी दिग्गज साहित्यिक पु ल देशपांडे यांची भूमिका साकारली होती.

योगेश जाधव यांच्या इमेल फिमेल मध्ये ते आता दुसऱ्यांदा नायकाच्या भूमिकेत दिसताहेत. फरक एवढाच आहे कि हा चित्रपट बी ग्रेड प्रकारातला वाटतोय.

चित्रपटाचं शीर्षकच त्याचा अंदाज देत आहे. ट्रेलर वरून ते स्पष्टच होतय. शंतनू कुलकर्णी (रत्नपारखी) आपल्या बायको आणि मुलीसोबत एक कंटाळवाणं आयुष्य जगतोय. आयुष्यात नवं काही तरी चैतन्य यावं म्हणून तो वेश्येला घरी बोलावतो.

मग अशा प्रकारचे उद्योग त्याचे नेहमीचे होऊन बसतात. लाजाळू, साधा असलेला शंतनू आता बेरकी आणि खोटं बोलणारा नवरा बनतो, पण याचे परिणाम त्याला लगेच भोगावे लागतात.

मस्ती (२००४), शादी नं १ (२००५) आणि नो एंट्री (२००५) सारख्या चित्रपटांच्या सद्दीचा एक काळ हिंदी चित्रपटांमध्ये होऊन गेलाय. हिंदी चित्रपटांसाठी हा विषय आता कालबाह्य झालाय. सोबतच ईमेल फिमेलच्या हाताळणीवरून वरील सांगितलेले चित्रपट उत्तम वाटायला लागतात.

ट्रेलर मध्ये रत्नपारखी बुजलेले वाटतात. इतरांबद्दल काही न बोललेलंच बरं. आणि विक्रम गोखले इथे काय करताहेत?

ईमेल फिमेल २० मार्चला प्रदर्शित होणार होता मात्र कोविड-१९ पॅनडेमिकमुळे चित्रपटाचे प्रदर्शन लांबले आहे.

ट्रेलर येथे पहा आणि आम्हाला सांगा, तुम्हाला हा चित्रपट बघायला आवडेल?

Related topics

Trailer review