{ Page-Title / Story-Title }

News Hindi

तारा सुतारिया दिसणार एक व्हिलनची सिक्वल मध्ये


मोहित सूरी दिग्दर्शित २०१४च्या थ्रिलर चित्रपटाचा सिक्वल लवकरच येत आहे, ज्यामध्ये आदित्य रॉय कपूर, जॉन एब्रहाम आणि दिशा पटनी प्रमुख भूमिका साकारत आहेत.

Suyog Zore

या वर्षाच्या सुरुवातीला मोहित सूरी यांनी एक व्हिलन (२०१४) च्या सिक्वलची घोषणा केली होती. त्यात जॉन एब्रहाम आणि आदित्य रॉय कपूर यांची नावं सुद्धा सामील होती. आता चित्रपटकर्त्यांनी चित्रपटाच्या नायिकांची नावं सुद्धा ठरवली आहेत.

काही दिवसांआधी अभिनेत्री दिशा पटनी यांचं नाव घोषित करण्यात आलं होतं. जॉन एब्रहाम यांच्या सोबत त्यांची जोडी असणार आहे. आता अशी बातमी आहे कि आदित्य रॉय कपूर यांच्या सोबत अभिनेत्री तारा सुतारिया यांना देखिल चित्रपटात घेण्यात आलंय. ट्रेड विशेषज्ञ तरण आदर्श यांनी ट्विटर वरून हि बातमी दिली.

सुतारिया यांनी धर्मा प्रॉडक्शनच्या स्टुडन्ट ऑफ द ईयर २ (२०१९) या चित्रपटातून पदार्पण केले. मरजावाँ (२०१९) या चित्रपटात त्यांनी अंध मुलीची भूमिका साकारली होती. सिद्धार्थ मल्होत्रा आणि रितेश देशमुख या चित्रपटात प्रमुख भूमिकेत होते. चित्रपटाने बॉक्स ऑफिस वर ठीक ठाक कमाई केली होती.

सूरी, ज्यांनी एक व्हिलनचे दिग्दर्शन केले होते, तेच या सिक्वलचे दिग्दर्शन करणार आहेत. मूळ चित्रपटात मल्होत्रा, श्रद्धा कपूर, देशमुख यांच्या प्रमुख भूमिका होत्या. सूरी यांचा या वर्षी प्रदर्शित झालेला मलंग (२०२०) सुद्धा बॉक्स ऑफिस वर ठीक ठाक कमाई करतोय. रॉय आणि पटनी यांनी चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट सध्या बहुतेक थिएटर मध्ये शेवटच्या काही दिवसांसाठी चालतोय.

एक व्हिलनच्या सिक्वलची निर्मिती एकता कपूर आणि भूषण कुमार करत आहेत. चित्रपट ८ जानेवारी २०२१ ला प्रदर्शित होईल.

Related topics