नागराज मंजुळे दिग्दर्शित हा चित्रपट ८ मे २०२० ला प्रदर्शित होतोय.
झुंड टीजर – अमिताभ बच्चन यांच्या गंभीर आवाजात त्यांच्या टीमच्या आगमनाची घोषणा
मुंबई - 21 Jan 2020 21:52 IST


Shriram Iyengar
नागराज मंजुळे यांचा आगामी चित्रपट झुंड (२०२०) खेळावर आधारित असला, तरीही यातून सामाजिक भाष्य करणे हे ते विसरलेले नाहीत. टीजरच्या माध्यमातून या अमिताभ बच्चन अभिनित चित्रपटामध्ये त्यांच्या सूक्ष्म मात्र प्रभावी शैलीची पुन्हा एकदा नव्याने ओळख होतेय.
टीजरच्या माध्यमातून चित्रपटाची ८ मे २०२० हि प्रदर्शनाची तारीख सुद्धा जाहीर करण्यात आली आहे. याआधी हा चित्रपट २० सप्टेंबर २०१९ ला प्रदर्शित होणार होता.
टीजरची सुरुवात अमिताभ बच्चन यांच्या गंभीर आवाजातून होते, जिथे ते सांगताहेत कि 'याला झुंड म्हणू नका सर, टीम म्हणा.' यानंतर काही युवकांची टोळी दिसते, जे हातात चेन, विटा, बॅट आणि स्टम्प्स घेऊन निघालेत. याच मुलांना अमिताभ बच्चन यांचा स्पोर्ट टीचर फुटबॉलचं प्रशिक्षण देणार आहे.
काल समोर आलेल्या पोस्टर मध्ये अमिताभ बच्चन पाठमोऱ्या आकृतीत दिसत होते. ते एका भिंतीकडे नजर लावून आहेत, ज्यामागे झोपडपट्टीतील वस्ती दिसते. हा चित्रपट विजय बारसे यांच्या जीवनानावर आधारित आहे, ज्यांनी स्लम सॉकर हि नागपूर मधील एनजीओ सुरु केली. या एनजीओ मार्फत गरीब आणि वंचित मुलांना फुटबॉलचे प्रशिक्षण दिले जाते.
या टीजरचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अजय-अतुल यांचं संगीत. यापूर्वी नागराज मंजुळे यांच्या सुपरहिट सैराट (२०१६) या चित्रपटाचं संगीत सुद्धा त्यांनीच दिलं होतं. टीजरमध्ये वापरण्यात आलेलं टायटल ट्रॅक चित्रपटाची उत्सुकता निश्चितच वाढवत आहे.
टीजर मध्ये कुणाचाही चेहरा दर्शवण्यात आलेला नाही, पण असाही एक अंदाज वर्तवण्यात येतोय कि यात आकाश ठोसर सुद्धा काम करताहेत.
टीजर येथे पहा आणि आम्हाला सांगा तुम्हाला हा चित्रपट पाहायला आवडेल का?