News Hindi Tamil Telugu

८३ फर्स्ट लुक – दीपिका पादुकोण, रणवीर सिंह बनलेत रोमी आणि कपिल देव


या लुक मध्ये दीपिका पादुकोण रोमी देव यांच्या पाहुण्या भूमिकेत दिसतात. रोमी पूर्व भारतीय कर्णधार कपिल देव यांच्या पत्नी आहेत.

Shriram Iyengar

रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण हि खऱ्या आयुष्यातील जोडी आता कपिल आणि रोमी देव यांच्या जोडीची भूमिका साकारत आहेत. कबीर खान यांच्या ८३ (२०२०) मध्ये पादुकोण नव्या लुक मध्ये रोमी देव यांच्या भूमिकेत दिसत आहेत. रोमी देव भारताच्या पहिल्या क्रिकेट विश्वविजेत्या टीमचे कर्णधार कपिल देव यांच्या पत्नी आहेत. 

पादुकोण यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर एक छायाचित्र टाकले. तिथे त्यांनी लिहिले, "खेळाच्या इतिहासातील ऐतिहासिक क्षणांना टिपणाऱ्या चित्रपटाचा भाग बनने हा एक सन्मान आहे. माझ्यासाठी ८३ म्हणजे त्या प्रत्येक स्त्रियांना एक भेट आहे ज्या आपल्या पतीच्या स्वप्नांसाठी आपलं स्वप्न बाजूला करतात."

या छायाचित्रात दोघे लॉर्ड्सच्या पवेलियनच्या लॉन्ग रूम मध्ये आपल्या व्यक्तिरेखेच्या वेशात दिसताहेत. या लॉन्ग रूम मध्ये बऱ्याचदा औपचारिक सन्मान दिले जातात. भारताच्या पहिल्या विश्वविजयाच्या थीम कडे बघता या छायाचित्रात दोघे विजयाचा आनंद घेत असतील असं दिसतंय. 

पादुकोण यांचे केस बॉबकट केलेले आहेत आणि त्यांनी काळ्या रंगाचे कपडे घातलेत. रणवीर सिंह भारतीय टीमचा अधीकृत ब्लेझर घालून आहेत, ज्यामुळे हे विजय साजरा करण्याचा हा अधीकृत सोहळा वाटतोय.

८३ मध्ये जीवा, साकिब सलीम, ताहीर राज भसीन, एमी विर्क, साहिल खट्टर, जतीन सरना आणि इतर कलाकार आहेत. पंकज त्रिपाठी या चित्रपटात पी आर मान सिंह यांच्या भूमिकेत आहेत, जे त्या काळात टीम मॅनेजर म्हणून कार्यरत होते.

८३ चित्रपट १० एप्रिलला प्रदर्शित होतोय.

Related topics