{ Page-Title / Story-Title }

News Marathi

पाय फ्रॅक्चर असून सुद्धा सई ताम्हणकरांनी केले टीव्ही शोचे शूटिंग


मिमी या त्यांच्या आगामी हिंदी चित्रपटाच्या शूटिंग मध्ये त्यांना हि दुखापत झाली.

फाईल फोटो – शटरबग्ज इमेजेस

Our Correspondent

कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे अनेकांना मुद्दाम घरी बसावं लागतंय. सई ताम्हणकर सुद्धा सध्या गेले काही दिवस तेच करत आहेत, मात्र कोरोना व्हायरस पॅनडेमिक हे त्याचं एकमेव कारण नाही. क्रिती सॅनन अभिनित मिमी (२०२०) या त्यांच्या आगामी हिंदी चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान ताम्हणकर यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्या डाव्या पायावर प्लास्टर चढवण्यात आले होते आणि ताम्हणकर यांना सक्तीची विश्रांती घ्यावी लागली.

पण या आठवड्यातच कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावावर प्रतिबंधक उपाय योजना म्हणून १९ ते ३१ मार्च २०२० पर्यंत चित्रपट, टेलिव्हिजन आणि वेब-सीरीज यांचे शूटिंग थांबवण्यात आले. म्हणून त्या अगोदर काही शूटिंग उरकून घेणे महत्वाचे झाले होते.

ताम्हणकर यांची इन्स्टाग्राम स्टोरी 

ताम्हणकर सध्या महाराष्ट्राची हास्य जत्रा कॉमेडी रियॅलिटी शोच्या जज आहेत. १९ मार्च पूर्वी शक्य तेवढ्या भागांचे चित्रीकरण करणे आवश्यक असल्याने ताम्हणकर पायाला प्लास्टर लावून चित्रीकरणासाठी पोहोचल्या, जेणेकरून त्यांच्यामुळे शोला कुठले नुकसान व्हायला नको. एवढंच नाही तर त्यांनी एका मांजरी सोबत एक फोटोशूट सुद्धा केले.

मिमी व्यतिरिक्त मिडीयम स्पायसी (२०२०) या मराठी चित्रपटात सुद्धा त्या काम करत आहेत. त्यांच्याबरोबर ललित प्रभाकर, पर्णा पेठे आणि सागर देशमुख या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत.

Related topics