{ Page-Title / Story-Title }

News Marathi

बळीच्या शूटिंग दरम्यान काही वेळा तर मी सुद्धा घाबरलोय, सांगताहेत स्वप्नील जोशी


विशाल फुरीया दिग्दर्शित बळी हा जोशींचा पहिला हॉरर चित्रपट आहे.

Keyur Seta

समांतर या थ्रिलर वेब-सिरीज नंतर स्वप्नील जोशी आता पहिल्यांदाच हॉरर चित्रपटात दिसणार आहेत. बळी शीर्षक असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल फुरीया यांनी केले आहे. यापूर्वी पूजा सावंत अभिनित लपाछपी (२०१७) या चित्रपटाद्वारे फुरीयांनी दिग्दर्शनात पदार्पण केले होते.

जोशी यांनी चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले असून चित्रपटावर ते खुश आहेत. "हा एक उत्तम चित्रपट आहे. मी स्वतःला हे वचन दिलंय कि २०२० हे वर्ष माझ्यासाठी वेगळ्या वळणाच्या कामांचं असेल. समांतर हा त्या वळणांवरचा पहिला प्रयत्न. बळी हा उत्तम हॉरर चित्रपट आहे. मी या शैलीच्या चित्रपटात आधी कधीच काम केले नव्हते," सिनेस्तानशी बोलताना त्यांनी सांगितले.

प्रेक्षक भयभीत होतील का, यावर जोशी लगेच उत्तरले, "हो नक्कीच. शूटिंग करत असताना मी सुद्धा काहीदा घाबरलोय. विशालची शूटिंग करण्याची वेगळीच पद्धत आहे. उदाहरणादाखल, तो तुम्हाला संपूर्ण शॉट सांगत नाही. त्यामुळे काहीदा तुम्हाला माहीतच नसतं कि दरवाज्यातून कोण येणार आहे.

"तो फक्त एवढंच सांगेल कि मला दरवाज्याजवळ जायचंय आणि मागे वळायचंय. तिथे चार दरवाजे आहेत आणि तिसऱ्या दरवाज्यातून एक जण येईल. तुम्ही स्वाभाविकपणे प्रतिक्रिया देता कारण तुम्ही घाबरलेले असता. गोष्ट मांडण्यात त्यांची हि अशी वेगळी शैली आहे, जी मला आवडली. विशाल सोबत काम करताना मला मजा आली."

गेल्या वर्षी जोशी यांचा मोगरा फुलला (२०१९) हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या कौटुंबिक रोमँटिक चित्रपटाचं कौतुक झालं होतं.

Related topics