{ Page-Title / Story-Title }

News Hindi

प्रियांका चोपडा, फरहान अख्तर, झायरा वसीम यांचा द स्काय इज पिंक चे पोस्टर


शोनाली बोस दिग्दर्शित स्काय इज पिंक ११ ऑक्टोबर ला रिलीज होईल.

Shriram Iyengar

आयशा चौधरीच्या आयुष्यावर आधारित शोनाली बोस दिग्दर्शित स्काय द इज पिंक चे पोस्टर रिलीज करून चित्रपटाच्या प्रमोशनला सुरुवात केली आहे. प्रियांका चोपडा, फरहान अख्तर, झायरा वसीम आणि रोहित सराफ यांच्या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत.

दिवंगत लेखिका आणि मोटिव्हेशनल स्पीकर आयशा चौधरी यांच्या आयुष्यावर हा चित्रपट आधारित आहे. आयेशाला सहा वर्षाची असल्यापासून इम्यून डिफिशियंसीचा आजार झाला होता. झायरा वसीमचा हा अभिनेत्री म्हणून शेवटचा चित्रपट असेल. या वर्षी जूनमध्ये झायराने यापुढे चित्रपटात काम करणार नाही असे जाहीर केले. मी आणि माझा धर्म यामध्ये दुरावा येऊ नये यासाठी मी हा निर्णय घेतला आहे असे तिने सांगितले.

पोस्टरवर झायरा आपले पालक प्रियांका चोपडा आणि फरहान अख्तरच्या पुढे धावताना दिसत आहे. पुढे येणाऱ्या दुःखाची अजिबात कल्पना नसलेले हे आनंदी कुटुंब या पोस्टरवर दिसत आहे.

निर्मात्यांनी पोस्टर रिलीज करून चित्रपटाच्या प्रमोशनला सुरुवात केली आहे. १३ सप्टेंबरला टोरांटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात द स्काय इज पिंकचा प्रीमियर होईल. एस के ग्लोबल आणि पर्पल पेबल पिक्चर्स यांच्या सहयोगाने आर एस वी पी आणि रॉय कपूर फिल्म्स ने निर्मिती केलेला हा चित्रपट ११ ऑक्टोबरला रिलीज होईल.

Related topics

Poster review