News Hindi

लक्ष्मी बॉम मधील नवीन फोटो मध्ये अक्षय कुमार जणू आपल्या आर्त स्त्रीत्वाला हाक देत आहेत

Read in: English | Hindi


अक्षय कुमार पहिल्यांदाच ट्रान्सजेन्डर च्या भूमिकेत दिसत आहेत.

Shriram Iyengar

या नवरात्रीला अक्षय कुमार स्वतःतले स्त्रीत्व शोधत आहेत. त्यांनी लक्ष्मी बॉम या आपल्या नवीन चित्रपटातील एक फोटो शेर केला असून फोटोमध्ये ते साडी नेसलेले दिसत आहेत.

आपल्या नवीन लुक विषयी बोलताना अक्षय कुमार म्हणाले की ते उत्सुक तर आहेत त्याचसोबत थोडे चिंतीत सुद्धा आहेत. "स्वतःतील अपार शक्ती ओळखून आपल्या आतील देवीला नतमस्तक होणे म्हणजेच नवरात्री होय. ही मंगल संधी साधून मी माझा लक्ष्मी हा लुक तुम्हा सर्वांसमोर आणत आहे."

लाल साडी, लाल टिकली, केसांचा अंबाडा असा लुकमध्ये अक्षय कुमार उभे आहेत. त्यांच्या मागे दुर्गेची मूर्ती आहे.

राघवा लॉरेन्स दिग्दर्शित लक्ष्मी बॉम मध्ये अक्षय कुमार एका घाबरट पुरुषाची भूमिका साकारत आहेत ज्याच्या अंगात नंतर लक्ष्मी या ट्रान्सजेन्डरचे भूत शिरते.

मुन्नी २ – कांचना (२०११) या तामिळ हॉरर कॉमेडी चित्रपटाचा अधिकृत रीमेक असलेला हा चित्रपट ५ जून २०२० ला रिलीज होईल. अक्षय कुमार सोबत चित्रपटात कियारा अडवाणी सुद्धा मुख्य भूमिकेत आहेत.

लक्ष्मी बॉम सोबतच अक्षय कुमार हाऊसफुल ४ (२०१९) तसेच गुड न्यूज (२०१९) या चित्रपटांच्या रिलीजची वाट पाहत आहेत. गुड न्यूज मध्ये अक्षय सोबतच करीना कपूर खान, क्रिती सॅनन आणि दिलजीत डोसांझ सुद्धा आहेत.

Related topics

Poster review