News Marathi

सुमित्रा भावे आणि सुनील सुखथनकर यांचा वेलकम होम १४ जून ला रिलीज होईल


मृणाल कुलकर्णी आणि मराठी चित्रपटसृष्टीतले अनेक नावाजलेले कलाकार आपल्याला या चित्रपटात दिसतील.

Keyur Seta

गेल्या दोन दशकांपासून सुमित्रा भावे आणि सुनील सुखथनकर ही दिग्दर्शक जोडी उत्तमोत्तम चित्रपट बनवत आहे. त्यांच्या पुढील चित्रपटाचे नाव वेलकम होम असून मृणाल कुलकर्णी आपल्याला या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसतील.

निर्मात्यांनी चित्रपटाविषयी म्हटले, "स्त्रियांसाठी त्यांचे हक्काचे घर कोणते? या प्रश्नाचे उत्तर शोधायचा प्रयत्न चित्रपटात केला आहे."

मृणाल कुलकर्णी व्यतिरिक्त चित्रपटात सुमित राघवन, सुबोध भावे, रेणुका दफ्तरदार, जितेंद्र जोशी, स्पृहा जोशी, डॉ मोहन आगाशे, अश्विनी गिरी, इरावर्ती हर्षे, दीपा श्रीराम, उत्तरा बावकर, सेवा चौहान, सिद्धार्थ मेनन, मिलिंद फाटक आणि इतर कलाकारांचा भरणा आहे.

आणि... डॉ काशिनाथ घाणेकर (२०१८) मध्ये काशिनाथ घाणेकर आणि श्रीराम लागू यांची भूमिका केल्यानंतर सुबोध भावे आणि सुमित राघवन पुन्हा आपल्याला या चित्रपटात एकत्र दिसतील.

भावे आणि सुखथनकर यांनी मिळून दोघी (१९९५), देवराई (२००४), वास्तुपुरुष (२००५), एक कप च्या (२००९), हा भारत माझा (२०१२), संहिता (२०१३), अस्तु (२०१४), कासव (२०१७) यासारखे दर्जेदार चित्रपट बनवले आहेत.

सुमित्रा भावेंनी दिठी (२०१८) या चित्रपटाचे सुद्धा दिग्दर्शन केले आहे. दिठी हा पहिलाच चित्रपट आहे जो सुमित्रा भावेंनी एकट्याने दिग्दर्शित केला आहे. वेलकम होम १४ जून ला रिलीज होईल.

Related topics