News Hindi

'चले आना' गाणे – अजय आणि रकुल प्रीत यांचे ब्रेकअप दुःख अमाल मलिक यांच्या या गाण्यात दिसते


अमाल मलिक ने या गाण्याला संगीत दिले असून त्यांचा भाऊ अरमान मलिक ने हे गाणे गायले आहे.

Shriram Iyengar

प्रेमाचा त्रिकोण असला की कोणा एकाच्या वाट्याला दुःख येणार हे साहजिकच आहे. या गाण्यातून निर्मात्यांनी अजय देवगण आणि रकुल प्रीत सिंह यांच्या पात्रांच्या प्रेमकहाणीचे पुढे काय होते ते दाखवले आहे.

अजय आणि रकुल यांच्या पात्रांच्या ब्रेकअप नंतर त्यांच्या आयुष्यात काय घडत आहे हे आपल्याला अमाल मलिक यांच्या या गाण्यातून दाखवले आहे.

चित्रपटाच्या ट्रेलर आणि प्रमोशन मध्ये सुद्धा त्या दोघांच्या वयामधला फरक हा ठळक मुद्दा म्हणून अधोरेखित केला आहे. गाण्याच्या सुरुवातीला अजय देवगण ब्रेकअप करण्याचं सुचवतात. त्यानंतर दोघेही आपापल्या पद्धतीने या दुःखाला सामोरे जात आहेत. गाण्याचा मेलडी चा अंदाज आपल्याला सहज लावता येतो.

अरमान मलिक ने त्यांच्या मधाळ आवाजात हे गाणे गायले आहे. गाण्यात व्हायोलिन आणि इतर वाद्यांचा वापर देखील साध्या पद्धतीने केला आहे. अरमान यांचा आवाज सगळ्यात जास्त उठून दिसतो. आपल्या मधाळ आवाजाने अरमान यांनी गीतकार कुणाल यांच्या शब्दांना पुरेपूर न्याय दिला आहे.

दे दे प्यार दे चे दिग्दर्शन अकिव अली यांनी केले आहे. १७ मे ला हा चित्रपट रिलीज होईल. गाणे खाली पहा आणि तुम्ही हा चित्रपट पाहणार का ते आम्हाला कळवा.

Related topics

Song review