{ Page-Title / Story-Title }

News Hindi

बधाई हो नंतर नीना गुप्ता रोहित शेट्टींच्या सूर्यवंशी मध्ये अक्षय कुमार यांच्या आईच्या भूमिकेत दिसतील


नीना गुप्ता म्हणाल्या या चित्रपटात त्या टिपिकल आईची भूमिकेत दिसणार नाहीत.

फोटो - शटरबग्स इमेजेस

Our Correspondent

नीना गुप्ता रोहित शेट्टी दिग्दर्शित सूर्यवंशी मध्ये दिसणार आहेत. या चित्रपटात त्या अक्षय कुमार यांच्या आईची भूमिका साकारतील असं त्यांनी मुंबई मिरर वर्तमानपत्राला सांगितले.

पण त्या म्हणाल्या की ही भूमिका आपण नेहमी रुपेरी पडद्यावर पाहतो तशी नसेल. "ही भूमिका मनोरंजक आहे," गुप्ता म्हणाल्या. "ही तुमची नेहमीची आई नाही, जी आपल्या मुलाला जेवलास का, लग्न कधी करशील, असे प्रश्ण विचारते. हिला अनेक आयाम आहेत. तिचा स्वभाव वेगळा आहे, आणि तुम्हाला अक्षय, कतरीना व माझ्यात एक वेगळे नाते पहायला मिळेल."

गुप्ता वेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री म्हणून ओळखल्या जतात. तरीही त्यांनी रोहित शेट्टी यांचे चित्रपट सुद्धा पाहिले आहेत. "मला आनंद आहे की माझं काम जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. रोहीत ने काही उत्तम चित्रपट बनवले आहेत जे एक प्रेक्षक म्हणून मला खूप आवडले होते."

बधाई हो च्या अभूतपूर्व यशानंतर गुप्ता यांच्या अभिनय कारकिर्दीला एक वेगळे वळण मिळाले. अमित शर्मा दिग्दर्शित बधाई हो मध्ये आयुष्मान खुराणा आणि सान्या मल्होत्रा प्रमुख भूमिकेत होते.

"३५-४० वर्षाच्या माझ्या अभिनय कारकिर्दीमध्ये मला ज्या हिट चित्रपटाची गरज होती ती गरज बधाई हो ने भरून काढली असं म्हणायला हरकत नाही," गुप्ता म्हणाल्या. "मी या अगोदर सुद्धा अनेक चित्रपट केले आहेत, पण जास्त लोकांनी माझे काम पहिले नव्हते."

त्यांनी इंस्टाग्राम वर मला काम हवंय अशी पोस्ट टाकली होती आणि त्याच पोस्ट मुळे त्यांना हा चित्रपट मिळाला. सूर्यवंशी मध्ये अक्षय कुमार अँटी-टेररिस्ट स्क्वाड अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहेत. कतरीना कैफ त्यांच्या पत्नीची भूमिका साकारणार आहेत. आजपासून चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होईल.

Related topics