News Marathi

रंपाट ट्रेलर – रवी जाधव यांच्या चित्रपटात अभिनय बेर्डे वडील लक्ष्मीकांत यांचे स्मरण करतात


ट्रेलर विनोदी असला तरी पोट धरून हसायला येत नाही.

Keyur Seta

रवी जाधव यांच्या रंपाट चा ट्रेलर रिलीज झाला आहे. या अगोदर अभिनय बेर्डे आणि काश्मीरा परदेशी यांच्या पात्रांची ओळख करून देणारे दोन व्हिडिओ रिलीज केले होते, त्याच बरोबर दोन गाणी सुद्धा रिलीज केली होती. आता ट्रेलरमध्ये इतर पात्रांची ओळख करून दिली आहे.

सोलापूर चा मिथुन (अभिनय) आणि कोल्हापूर ची मुन्नी (कश्मिरा) यांना मोठं फिल्म स्टार व्हायचं आहे. त्यांना हिंदी चित्रपटांचं वेड आहे. आणि आपले हेच स्वप्न पूर्ण करायला निघालेले असताना त्यांची एकमेकांशी भेट होते.

ट्रेलर मध्ये मिथुनची आई दाखवली आहे आणि तीसुद्धा फिल्मवेडी आहे. मुन्नी चे वडील कुस्तीपटू आहेत आणि दंगल (२०१६) पाहून प्रेरित झाल्यामुळे ते सुद्धा आपल्या मुलीला कुस्तीपटू बनवण्याचे स्वप्न पाहतात.

ट्रेलर विनोदी असला तरी पोट धरून हसायला येत नाही. यशराज स्टुडिओ आणि बालाजी स्टुडिओ च्या बाहेर होतकरू अभिनेते-अभिनेत्री कसे झुंबड करून उभे असतात हे सुद्धा आपल्याला दिसते.

अभिनय दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे पुत्र आहेत. ट्रेलरच्या एका सीन मध्ये अभिनय यांचे पात्र मिथुन ला सुद्धा लक्ष्मीकांत बेर्डे यांचा अभिनय आवडतो असे दाखवले आहे.

१७ मे ला रंपाट रिलीज होणार आहे. खाली ट्रेलर पहा आणि तुम्ही चित्रपट पाहणार का ते आम्हाला कळवा.

Related topics

Trailer review