News Marathi

मोगरा फुलला टीजर – स्वप्नील जोशींना नीना कुलकर्णींसारखी आई असल्याचा आनंद


आतापर्यंत करण्यात आलेल्या प्रमोशनचा सारांश या टीजरमध्ये पाहायला मिळतो.

Keyur Seta

मोगरा फुललाच्या निर्मात्यांनी आतापर्यंत चित्रपटातील दोन गाणी आणि काही पोस्टर्स रिलीज केले. आतापर्यंत चित्रपटाचे करण्यात आलेले प्रमोशन वर नजर टाकता आपल्याला इतके समजलेच आहे की चित्रपटात स्वप्नील जोशी सुनील नावाची व्यक्तिरेखा साकारत आहेत. सुनील एक कर्मचारी आहे आणि वयाची तिशी पार होऊन सुद्धा त्याचे लग्न झालेले नाही.

चित्रपटाच्या शीर्षकगीतामध्ये आपल्याला कळते सुनील ने आतापर्यंत ३८ मुली पहिल्या आहेत पण काही कारणास्तव कोणाशीही त्याचे लग्न जमू शकले नाही. त्यानंतर शिवांगी (सई देवधर) त्याच्याच कंपनीत कामाला रुजू होते आणि तिथेच त्यांची मने जुळतात.

टीजरमध्ये चित्रपटाच्या कथेविषयी अधिक माहिती मिळेल अशी अपेक्षा होती, परंतु आपल्याला अगोदरच ठाऊक असलेली माहिती पुन्हा या टीजरमध्ये सांगितली आहे.

सुनील आणि त्याच्या आईचे नाते किती घट्ट आहे हे या टीजरमधून अधोरेखित केले आहे. रिलीजगोदर चित्रपटाचे कथानक लोकांनां समजू नये यासाठी निर्मात्यांनी प्रमोशनची नवी योजना आखली असावी.

टीजरमध्ये शंकर महादेवन यांच्या मधाळ आवाजतले गाणे ऐकायला मिळते. शंकर महादेवन यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. कट्यार काळजात घुसली (२०१५) मधील त्यांनी गायलेली गाणी कानसेनांच्या अजून लक्षात आहेत.

श्राबनी देवधर दिग्दर्शित मोगरा फुलला १४ जून ला रिलीज होईल. टीजर खाली पहा.

Related topics

Teaser review