संगीत दिग्दर्शक पार्थ उमराणी यांनी आपल्या आल्हाददायक आवाजात हे गाणे गायले आहे.
वेलकम होम मधील 'राधे राधे' गाणे – मृणाल कुलकर्णी, सुमित राघवन वर चित्रित भक्तीगीत
मुंबई - 28 May 2019 14:00 IST
Updated : 31 May 2019 2:20 IST


Keyur Seta
सुमित राघवन आणि मृणाल कुलकर्णी शहराच्या व्यस्त जीवनापासून विश्रांती मिळावी म्हणून दूर एका खेड्यात जातात. तेथे हिरवीगार झाडी आणि तलावाजवळ जाऊन उभे राहतात.
आता अशा परिस्थितीत भक्तीगीत ऐकायला मिळेल अशी अपेक्षा नक्कीच नसते. पण सुमित्रा भावे आणि सुनील सुखथनकर दिग्दर्शित वेलकम होम मधील 'राधे राधे' हे गाणे ऐकून तुम्हाला ही नवीन कल्पना बिलकुल खटकणार नाही. दृश्य आणि ध्वनी यांचा अगदी योग्य मेळ बसला आहे हे तुम्हाला गाणे पाहताच जाणवेल.
ज्यांची देवावर अतोनात श्रद्धा नाही अशा लोकांना तसेच नास्तिक लोकांना सुद्धा हे गाणे आवडेल. संगीत दिग्दर्शक पार्थ उमराणी यांनी आपल्या आल्हाददायक आवाजात हे गाणे गायले आहे. सुनील सुखथनकरांनी गाण्यासाठी काव्यमय शब्दरचना केली आहे.
गाण्यात मृणाल कुलकर्णींच्या मनात अनेक विचार चालू आहेत आणि सुमित राघवन त्यांच्यासोबत उभे आहेत. मृणाल कुलकर्णींनी फक्त नजरेतून आणि हावभावातून त्यांच्या मनातली घालमेल व्यक्त केली आहे. आपण दररोज महामार्गावरून हजारो मोटारगाड्या जाताना पाहतो पण क्वचितच आपल्या लक्षात येते की या प्रत्येक गाडीतील प्रवाशांची स्वतःची एक गोष्ट आहे.
१४ जून ला रिलीज होणाऱ्या वेलकम होम मध्ये सुबोध भावे, मोहन आगाशे, सिद्धार्थ मेनन, अश्विनी गिरी आणि स्पृहा जोशी महत्वाच्या भूमिकेत आहेत. खाली गाणे पहा.