News Hindi

रणवीर सिंह यशराज फिल्म्स निर्मित चित्रपटात जयेशभाई जोरदार ही भूमिका साकारणार

Read in: English | Hindi


अभिनेता दिव्यांग ठक्कर या विनोदी चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. दिग्दर्शक म्हणून हा त्यांचा पहिलाच चित्रपट आहे.

Our Correspondent

रणवीर सिंह यशराज फिल्म्स सोबत अजून एक चित्रपट करणार आहेत. या चित्रपटात ते जयेशभाई जोरदार नावाच्या पात्राची भूमिका साकारणार आहेत.

अभिनेता दिव्यांग ठक्कर या विनोदी चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून मनीष शर्मा या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.

दिग्दर्शक म्हणून हा ठक्कर यांचा पहिलाच चित्रपट आहे. गुजरातमध्ये घडणारी ही एक विनोदी कथा आहे असे निर्मात्यांनी सांगितले.

चित्रपटाविषयी रणवीर सिंह म्हणाले, "जयेशभाई या चित्रपटाची संकल्पना सर्व सिनेमा चाहत्यांना आवडेल. हा चित्रपट सर्वांसाठी आहे."

ही अविश्वसनीय स्क्रिप्ट आहे, असे रणवीर यांनी सांगितले. "ही अविश्वसनीय स्क्रिप्ट यशराज ने माझ्यासाठी शोधून काढली. स्क्रिप्ट इतकी चांगली होती की मी ती वाचताच हो म्हणालो. कथा विनोदी असली तरी त्याला एक दुःखाची झालर आहे, म्हणूनच मी वाचलेल्या उत्तम स्क्रिप्ट पैकी ही एक आहे असे मला वाटते."

जयेशभाई जोरदार हा रणवीर सिंह यांचा यशराज फिल्म्स सोबत सहावा चित्रपट असेल. या अगोदर त्यांनी यशराज सोबत बँड बाजा बारात (२०१०), लेडीज वरसस् रिकी बहल (२०११), गुंडे (२०१४), किल दिल (२०१४) व बेफिक्रे (२०१६) हे चित्रपट केले आहेत.

रणवीर पुढे म्हणाले की ते खूप नशीबवान आहेत कारण त्यांना भारतातल्या काही उत्कृष्ट फिल्ममेकर्स सोबत काम करायला मिळाले. "मी स्वतःला भाग्यवान समजतो की त्यांनी त्यांच्या स्वप्नांना चित्ररूप देण्यासाठी माझी निवड केली. मी आता जो काही आहे त्याचे सर्व श्रेय त्यांना जाते."

प्रथमच दिग्दर्शन करणाऱ्या ठक्कर यांची स्तुती करत ते म्हणाले, "मला आनंद आहे की मी दिव्यांग चे टॅलेंट ओळखू शकलो आणि त्याच्या मागे उभा राहू शकतो. '८३ नंतर मी दिव्यांग चा जयेशभाई जोरदार हा चित्रपट करणार आहे."

मनीष शर्मा यांनी सुद्धा जुन्या आठवणींना उजाळा दिला. बँड बाजा बारात पासून दोघांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. "आम्हा दोघांसाठी हा प्रोजेक्ट खूप महत्वाचा आहे, कारण याद्वारे रणवीर आणि मी नवीन पिढीसाठी मार्ग बनवत आहोत. एक दशकापूर्वी यशराज ने आम्हा नवोदित कलाकारांना संधी दिली होती आणि आता आम्ही सुद्धा नवोदित टॅलेंट सोबत प्रेक्षकांसाठी उत्तम आशय आणि एंटरटेनमेंट असलेला चित्रपट घेऊन येणार आहोत."

या वर्षी ऑक्टोबर पासून या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होईल.

Related topics