{ Page-Title / Story-Title }

News Marathi

गर्लफ्रेंड पोस्टर – सई ताम्हणकर अमेय वाघच्या गर्लफ्रेंडच्या भूमिकेत


अमेय वाघ गेल्या महिनाभरापासून फॅन्सना त्यांची गर्लफ्रेंड कोण असेल याचा अंदाज लावायला सांगत होते.

Keyur Seta

काही दिवस उत्सुकता ताणून ठेवल्यानंतर आता शेवटी अमेय वाघ यांनी आपला पुढील चित्रपट गर्लफ्रेंड मध्ये त्यांच्या गर्लफ्रेंडच्या भूमिकेत कोण असेल याचा खुलासा केला.

सई ताम्हणकर त्या गर्लफ्रेंड च्या भूमिकेत दिसतील. अमेय वाघ यांनी सोशल मीडियावर चित्रपटाचे नवीन पोस्टर शेर करत ही बातमी दिली.

ताम्हणकर आयेशा नावाच्या मुलीची भूमिका साकारत आहेत तर अमेय वाघ नचिकेत प्रधानच्या भूमिकेत दिसतील. वाघ अनेकांना सोशल मीडियावरून त्यांची गर्लफ्रेंड कोण असेल असा प्रश्न विचारत होते.

स्पृहा जोशी, सोनाली कुलकर्णी, श्रेया बुगडे, प्रिया बापट या मराठीतील काही अभिनेत्रींनी अमेय वाघ यांना गर्लफ्रेंड मिळाली का असा प्रश्न सोशल मीडियावर सोमवारी विचारला. ताम्हणकर यांनी सुद्धा या प्रमोशन च्या नवीन प्रकारत आपला सहभाग नोंदवला.

पर्ण पेठे, अमृता खानविलकर, मिथिला पालकर आणि रसिक सुनील या अभिनेत्रींनी सुद्धा या प्रमोशनच्या प्रकारात भाग घेतला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे झरीन खान आणि पूनम ढिल्लों या बॉलिवूड अभिनेत्रींचे नाव सुद्धा या लिस्ट मध्ये आहे.

गेल्या आठवड्यात रिलीज झालेल्या टीजरमध्ये आपल्याला अमेय वाघ यांच्या पात्राविषयी माहिती दिली होती. वाघ यांचा पात्र एक अत्यंत हुशार युवक आहे पण त्याची एकपण गर्लफ्रेंड नाही. आजकालच्या जमान्यात मुलांवर गर्लफ्रेंड असायलाच हवी हा जो सामाजिक दबाव असतो त्यावर विनोदी पद्धतीने या  चित्रपटात प्रकाश टाकला आहे.

Related topics

Poster review