{ Page-Title / Story-Title }

News Hindi

बाबो ट्रेलर – यु एफ ओ येण्याच्या बातमीने गावात उडाला गोंधळ


चित्रपटात किशोर कदम, सयाजी शिंदे, भारत गणेशपुरे, निशा परुळेकर, प्रतीक्षा मुणगेकर यांसारखे कलाकार आहेत.

Keyur Seta

रमेश साहेबराव चौधरी दिग्दर्शित बाबो ची कथा महाराष्ट्रातल्या एका छोट्या खेड्यामध्ये घडते. या गावात एकापेक्षा एक अशी अतरंगी पात्र आहेत. किशोर कदम, सयाजी शिंदे, भारत गणेशपुरे, निशा परुळेकर, प्रतीक्षा मुणगेकर यांनी ही पात्रं साकारली आहेत.

जितकी जास्त पात्र तितकेच जास्त त्यांचे प्रॉब्लेम्स पण आहेत. गावात एकीकडे आपल्या मुलाच्या पुस्तकात पुरुषाचा फोटो पाहून वडील काळजीत पडले आहेत तर दुसरीकडे दोन पुढारी एकमेकांच्या जीवावर उठले आहेत. गावात प्रत्येकाचेच असे अनेक छोटे मोठे प्रॉब्लेम्स आहेत.

पण गावासमोर अचानक एक खूप मोठा प्रॉब्लेम उभा ठाकतो तेव्हा सगळे गावकरी एकत्र येऊन त्यावर तोडगा काढायचा ठरवतात. त्यांच्या गावात अंतराळयान येणार अशी बातमी न्यूज चॅनेलवर गावकरी पाहतात. आता त्यांच्याकडे फक्त २४ तास आहेत असं कळताच त्यांचा अजेंडाच बदलून जातो.

गेल्या महिन्यात रिलीज झालेल्या टीजर वरून आपल्याला कथेचा बऱ्यापैकी अंदाज येतो. ट्रेलरमध्ये हीच कथा अधिक विस्तृतपणे दाखवली आहे. पण ट्रेलरमध्ये आपल्याला कथानकाविषयी अधिक काहीच माहिती मिळत नाही. ट्रेलरला योग्य फ्लो सुद्धा नाही.

तरीही चित्रपटाची कथा इंटरेस्टिंग आहे आणि अंतराळयान गावात आल्यावर नक्की काय होईल आणि ते गावात येईल तरी का हे पाहायची उत्सुकता आहे.

बाबो ३१ मे ला रिलीज होईल. खाली ट्रेलर पहा.

Related topics

Trailer review