{ Page-Title / Story-Title }

News Hindi

दे दे प्यार दे मधले 'दिल रोयी जाये' गाणे – प्रेमभंगातून बाहेर पडताना होणारा त्रास


रोचक कोहली यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याला अरिजीत सिंह यांनी आवाज दिला असून कुमार यांनी गाण्याचे शब्द लिहले आहेत.

Shriram Iyengar

अकीव अली दिग्दर्शित दे दे प्यार दे चित्रपटातील नवीन गाण्यात अजय देवगण आणि रकुल प्रीत सिंह एकमेकांपासून वेगळे झाल्यानंतर त्यांना होणारा त्रास दाखवला आहे. 'दिल रोयी जाये' हे गाणे रोचक कोहली यांनी संगीतबद्ध केले असून अरिजीत सिंह यांनी गाण्याला आवाज दिला आहे.

या दोन पात्रांच्या ब्रेकअपचा त्यांच्यावर काय परिणाम होत आहे हे या गाण्यात दाखवले आहे. अजय देवगण आपल्या विभक्त कटुंबाकडे परत येतात तर रकुल प्रीत पुन्हा आपल्या कामावर रुजू होतात.

दोघांनाही एकत्र घालवलेल्या क्षणांची आठवण येत राहते. तब्बू एका समजूतदार स्त्री च्या भूमिकेत दिसत आहेत आणि त्यांच्या भूमिके मुळेच या कथेला एक वेगळे वळण मिळेल असे वाटते.

रोचक कोहली यांचे संगीत कर्णमधुर आहे. अरिजीत सिंह यांनी आपल्या आवाजाने गाण्याला साज चढवला आहे. कुमार यांनी साध्या शब्दांतून गाण्याचे भाव आपल्यापर्यंत पोचवले आहेत.

कोहली यांनी गाण्यात अकौस्टिक गिटार आणि पर्कशन बीट्स वापरले आहेत. दे दे प्यार दे च्या अल्बम मध्ये अजून एका चांगल्या गाण्याची भर पडलीय.

अकीव अली दिग्दर्शित दे दे प्यार दे १७ मे ला रिलीज होईल. 'दिल रोयी जाये' गाणे खाली पहा.

Related topics

Song review