बाबो चित्रपटात मात्र किशोर कदम, सयाजी शिंदे आणि भारत गणेशपुरे सारखे उत्तम कलाकारांची निवड केलेली आहे.
बाबो ट्रेलर – विचित्र लोकांनी भरलेल्या गावात जेव्हा यु एफ ओ येतो तेव्हा काय होते?
मुंबई - 15 May 2019 1:31 IST


Keyur Seta
दिग्दर्शक रमेश चौधरी यांचा बाबो हा पूर्ण विनोदी चित्रपट असला तरी सुद्धा त्यात एक ट्विस्ट आहे.
महाराष्ट्रातल्या एका छोट्या गावात ही कथा घडते. गावातल्या काही लोकांना न्यूज अँकर दोडके गुरुजी (भारत गणेशपुरे) बद्दल विशेष आकर्षण आहे. सयाजी शिंदे यांना मात्र हे आवडत नाही की त्यांची पत्नी सतत दोडकेची स्तुती करत असते.
किशोर कदम यांना चिंता आहे की त्यांचा तरुण मुलगा सुद्धा दोडकेचा फोटो न्याहाळत असतो. चित्रपटात इतर पात्र सुद्धा आहेत आणि त्यांचे सुद्धा वयक्तिक प्रॉब्लेम्स आहेत.
पण आता गावात यु एफ ओ येणार आहे आणि दोडकेच्या मते गावकऱ्यांकडे फक्त २४ तास बाकी आहेत.
बाबो हा काही विचित्र पात्रांनी भरलेला विनोदी चित्रपट असेल असं ट्रेलर पाहून वाटते. यु एफ ओ चा अँगल चित्रपटात कसा हाताळला आहे हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
कलाकारांची निवड मात्र उत्तम आहे. टीजर मध्ये मात्र खूपच गोंधळ आहे. १ मिनिटामध्ये खूप काही दाखवण्याच्या मोहापायी हे घडले असे वाटते.
३१ मे ला हा चित्रपट रिलीज होईल. खाली टीजर पहा आणि तुम्ही चित्रपट पाहणार का ते आम्हाला कळवा.