अजय देवगण आणि रकुल प्रीत सिंह परदेशातल्या रस्त्यांवर एकत्र हिंडणे, एकत्र जेवण बनवणे यासारख्या रोमँटिक गोष्टी करताना दिसतात.
'तू मिला तो है ना' गाणे – अजय देवगण, रकुल प्रीत यांच्यावर चित्रित रोमँटिक गाण्याला अरिजित सिंह ने दिला आवाज
मुंबई - 15 May 2019 1:11 IST


Shriram Iyengar
अकिव अली यांच्या दे दे प्यार दे मध्ये प्रेमी जोडप्याच्या वयातील अंतर हा जरी महत्वाचा विषय असला तरी अमाल मलिक यांनी चित्रपटाला हलकेफुलके संगीत दिले आहे. दे दे प्यार दे मधल्या या दुसऱ्या गाण्याला मलिक यांनी संगीत दिले असून अरिजित सिंह यांनी हे गाणे गायले आहे.
अजय देवगण आणि रकुल प्रीत सिंह नुकतेच प्रेमात पडल्यामुळे एकमेकां विषयीचे आकर्षण आणि प्रेमाचे नवखेपण या गाण्यात दाखवले आहे. परदेशातल्या रस्त्यांवर एकत्र हिंडणे, एकत्र जेवण बनवणे या सारख्या रोमँटिक गोष्टी करताना ते दिसतात.
आपल्या वयामुळे लोकं आपल्याकडे विचित्र नजरेने पाहत असतील असा विचार अजय देवगण यांच्या पात्राच्या मनात चालूच आहे.
गाण्यात पॉप संगीताचा हलका वापर आहे, त्याचबरोबर हार्मनी आणि मेलडी वर पण भर दिला आहे. कुणाल वर्मा यांचे शब्द देखील गाण्याच्या चालीमध्ये चपखल बसतात. दोन्ही पात्रांच्या वयातल्या फरकाचा गाण्यात उल्लेख आहे.
मलिक यांनी गाण्यात अरिजित सिंह यांच्या आवाजावर जास्त फोकस ठेवला असून साथीला इलेक्ट्रिक गिटार आहे. गाण्यात ड्रम सुद्धा वापरले आहेत. पण सिंह यांचा आवाजच गाण्यात खरी मजा आणतो.
१७ मे ला चित्रपट रिलीज होईल. खाली गाणे पहा आणि तुम्ही चित्रपट पाहणार का ते आम्हाला कळवा.