{ Page-Title / Story-Title }

News Hindi

अभिमन्यू सिंह सूर्यवंशी मध्ये अक्षय कुमार विरुद्ध खलनायकाची भूमिका साकारणार


रोहित शेट्टी दिग्दर्शित सूर्यवंशी हा त्यांच्याच सिम्बा (२०१८) या चित्रपटाचा स्पिनऑफ आहे.

Our Correspondent

सिम्बा (२०१८) मध्ये रणवीर सिंह विरुद्ध सोनू सूद यांना खलनायकाच्या भूमिकेसाठी निवडल्यानंतर सूर्यवंशीमध्ये अक्षय कुमार विरुद्ध खलनायकाच्या भूमिकेसाठी रोहित शेट्टी यांनी अभिमन्यू सिंह यांची निवड केली आहे.

या अगोदर अभिमन्यू सिंह यांनी श्रीदेवींची प्रमुख भूमिका असलेल्या मॉम (२०१७) मध्ये काम केले होते.

राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित अक्स (२००१) मधून अभिमन्यू यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी गुलाल (२००९), गोलियों की रासलीला राम-लीला (२०१३) आणि मॉम (२०१७) या हिंदी चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या. थीरान अढिगाऱम ओंद्रु (२०१७) या तमिळ चित्रपटात सुद्धा त्यांनी महत्वाची भूमिका केली होती.

अह्मदाबाद मिरर या नियतकालिकेशी बोलताना अभिमन्यू सिंह यांनी सांगितले की या तमिळ चित्रपटामुळेच त्यांना रोहित शेट्टींचा हा नवीन चित्रपट मिळला. "त्यांना माझा त्या तमिळ चित्रपटातील अभिनय खूप आवडला आणि त्यांची खात्री पटली की मी सूर्यवंशींमध्ये खलनायकाची भूमिका साकारू शकतो."

हा खूप खतरनाक व्यक्ती आहे आणि तो भारतात एक मिशन पूर्ण करायला आला आहे, असं अभिमन्यू म्हणाले. अक्षय कुमार अँटी टेररिस्ट स्क्वॉड चे अधिकारी आहेत, या वरून हा चित्रपट आतंकवादी कारवायां भोवती फिरतो असे वाटते.

सध्या सर्व फिल्म क्रू मुंबईत १०-१५ दिवस चित्रपटाची शूटिंग करणार आणि त्यानंतर ते शूटिंगसाठी बँगकॉक, थायलंड, ला जातील आणि शेवटी पुन्हा हैद्राबादला येतील.

सूर्यवंशी मध्ये कतरीना कैफ आणि नीना गुप्ता सुद्धा महत्वाच्या भूमिकेत आहेत. ईद २०२० ला हा चित्रपट रिलीज होईल.

Related topics