{ Page-Title / Story-Title }

News Hindi

चेहरे मध्ये अमिताभ बच्चन कधीही न पाहिलेल्या वेशात – पिक्चर्स पहा


वयस्कर वकिलाच्या भूमिकेत अमिताभ बच्चन यांचा खूप वेगळा लुक पाहायला मिळेल. चित्रपटात इम्रान हाश्मी सुद्धा प्रमुख भूमिकेत आहेत.

Our Correspondent

अमिताभ बच्चन यांनी थरारपट चेहरे मधील त्यांचा नवीन लुक रिव्हील केला. रुमी जाफरी दिग्दर्शित या चित्रपटात अमिताभ बच्चन खूप वेगळ्या वेशात दिसतील.

त्यांनी या अगोदर सुद्धा अनेक वेळा वयस्कर भूमिका साकारल्या आहेत, पण त्या भूमिकांपेक्षा या भूमिकेचा लुक खूपच वेगळा आहे. एक विचित्र हिरव्या रंगाची टोपी आणि त्याहूनही विचित्र पोनीटेल बांधलेली दाढी असा त्यांचा लुक आहे.

हा लुक पाहून शाद अली यांच्या झूम बराबर झूम (२००७) मधल्या त्यांच्या लुक ची आठवण येते.

पिंक (२०१६) आणि बदला (२०१९) नंतर अमिताभ बच्चन पुन्हा एकदा वकिलाच्या भूमिकेत दिसतील. १० मे पासून चेहरे च्या शूटिंग ला सुरुवात झाली.

इम्रान हाश्मी आणि अमिताभ बच्चन पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. गेल्या महिन्यात इम्रान हाश्मी यांनी ट्विटर वरून बच्चन सोबत काम करायला मिळालेल्या संधी बद्दल आनंद व्यक्त केला.

ते म्हणाले, "अमिताभ बच्चन सोबत काम करण्यास मी खूप उत्सुक आहे. आनंद पंडित निर्मित आणि रुमी जाफरी दिग्दर्शित हा चित्रपट २१ फेब्रुवारी २०२० ला रिलीज होईल."

१२ मे ला त्यांनी ट्विटरवर त्यांची आजी आणि अमिताभ बच्चन यांच्याशि संबंधित एक किस्सा सांगितला. "कालच मी बच्चन सरां सोबत माझा पहिला सीन शूट केला तेव्हा बोलता बोलता आमच्या लक्षात आलं की कालच जंजीर प्रदर्शित होऊन ४६ वर्ष पूर्ण झाली आणि त्या चित्रपटात माझ्या आजीने त्यांच्या आईची एक छोटीशी भूमिका केली होती."

चेहरे मध्ये क्रिती खरबंदा, ऱ्हिया चक्रवर्ती, सिद्धांत कपूर, ध्रीतिमन चॅटर्जी, रघुबीर यादव आणि अन्नू कपूर सुद्धा महत्वाच्या भूमिकेत दिसतील.

Related topics