{ Page-Title / Story-Title }

News Marathi

गर्लफ्रेंड टीजर – गर्लफ्रेंड नसल्याने हताश झालेले अमेय वाघ


अमेय वाघ पुन्हा एकदा विनोदी भूमिकेत रुपेरी पडद्यावर दिसतील.

Keyur Seta

अमेय वाघ यांनी नुकतेच सोशल मीडियावरून सांगितले की त्यांच्या पुढील चित्रपटाचे शीर्षक गर्लफ्रेंड असणार आहे. त्यांनी चित्रपटाचे पोस्टर सुद्धा शेर केले होते, ज्यावर ते एका मुलीच्या आकृतीसोबत उभे आहेत. टीजरमधून आपल्याला त्यांच्या पात्राविषयी अधिक माहिती मिळते.

शीर्षकावरूनच समजते की चित्रपटात गर्लफ्रेंड हा खूप महत्वाचा विषय आहे. चित्रपटात अमेय वाघ यांनी नचिकेत नावाच्या एका अभ्यासू युवकाची व्यक्तिरेखा साकारली आहे ज्याला आतापर्यंत आयुष्यात एकपण गर्लफ्रेंड नाही. जेव्हा तो इतर कपल्स कडे पाहतो तेव्हा त्याला स्वतःची शरम वाटते.

आजकालच्या काळात मुलांना गर्लफ्रेंड असण्याबद्दल जो सामाजिक दबाव असतो त्यावर हा टीजर प्रकाश टाकतो. सदैव सिंगल असलेल्या युवकाचे नैराश्य या टीजरमध्ये दाखवले आहे.

पण ही सर्व गोष्ट चित्रपटात विनोदीपद्धतीने मांडली आहे. अमेय वाघ कडे नैसर्गिक विनोदी शैली आहे.

गर्लफ्रेंड हा चित्रपट क्षितिज पटवर्धन यांनी लिहला आहे. क्षितिज पटवर्धन यांनी अमेय वाघ यांची प्रमख भूमिका असलेला फास्टर फेणे (२०१७) ची पटकथा लिहली होती.

संवाद आणि पटकथा लेखक उपेंद्र सिद्धये यांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिला चित्रपट आहे.

Related topics

Teaser review