News Marathi

मोगरा फुलला मधल्या 'मनमोहिनी' गाण्यात स्वप्नील जोशी लाजाळू स्वभावाच्या प्रियकराच्या रूपात


गाण्यात स्वप्नील जोशींच्या पात्राच्या प्रेयसी (सई देवधर) ची झलक दिसते.

Keyur Seta

मोगरा फुलला मध्ये स्वप्नील जोशी यांनी कुटुंबाच्या जबाबदारीमुळे उशिरा प्रेमात पडलेल्या पुरुषाची भूमिका साकारली आहे.

'मनमोहिनी' गाण्यात आपल्याला जोशींच्या पात्राच्या प्रेयसी (सई देवधर) ची झलक दिसते.

रोहित श्याम राऊत यांचा आवाज आपले मन हळूच मोहित करतो. अभिषेक खामकर यांनी आपल्या शब्दांतून या दोन पात्रांचे सात्विक प्रेम व्यक्त केले आहे.

रोहित राऊत यांनीच हे गाणे संगीतबद्ध केले आहे. गाण्यात वापरलेल्या बासरीमुळे हे गाणे एका वेगळ्याच उंचीवर जाते.

स्वप्नील जोशींनी मराठी चित्रपटांमध्ये कित्येकदा लव्हरबॉय च्या भूमिका साकारल्या आहेत, उदाहरणार्थ मुंबई-पुणे-मुंबई फ्रँचाइज. पण या चित्रपटात ते थोड्या वयस्कर आणि स्वभावाने लाजऱ्या पुरुषाची भूमिका साकारत आहेत. ही भूमिका पाहून आपल्याला रब ने बना दी जोडी (२००८) मधल्या सुरिंदर साहनी ची आठवण येते.

सई देवधर आणि जोशी यांची जोडी शोभून दिसते. देवधर खूप वर्षांनी मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. त्यांनी या अगोदर दायरा (१९९६) या हिंदी आणि लपंडाव (१९९३) या मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. गेली कित्येक वर्षे त्या टीव्ही वर काम करत होत्या.

या चित्रपटात नीना कुलकर्णी स्वप्नील जोशींच्या आईच्या भूमिकेत दिसतील. श्राबनी देवधर दिग्दर्शित मोगरा फुलला १४ जून ला रिलीज होईल.

खाली 'मनमोहिनी' गाणे पहा आणि तुम्ही चित्रपट पाहण्यास उत्सुक आहात का ते आम्हाला कळवा.

Related topics

Song review