News Hindi Telugu

कबीर सिंह ट्रेलर – रागीट स्वभावाचे शाहिद कपूरचे पात्र प्रेमभंगामुळे ड्रगच्या आहारी जातो


संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित हा चित्रपट त्यांच्याच तेलगू चित्रपट अर्जुन रेड्डी (२०१७) चा अधिकृत रीमेक आहे.

Shriram Iyengar

प्रत्येक पिढीचा एक स्वतःचा देवदास आहे आणि संदीप रेड्डी वंगा यांचा कबीर सिंह सुद्धा त्यातलाच एक आहे असं म्हणायला हरकत नाही.

या चित्रपटात शाहिद कपूर यांनी प्रेमभंग झाल्यानंतर नशा आणि दारूच्या आहारी गेलेल्या स्वभावाने रागीट डॉक्टर ची भूमिका केली आहे.

ट्रेलर मध्ये सुद्धा शाहिद यांच्या पात्राचा प्रेमभंग झाल्यानंतरचा राग दाखवला आहे.

संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित हा चित्रपट त्यांच्याच तेलगू चित्रपट अर्जुन रेड्डी (२०१७) चा अधिकृत रीमेक आहे. ट्रेलरच्या सुरुवातीला गर्लफ्रेंड प्रीती (कियारा आडवाणी) शी ब्रेकअप झाल्यामुळे दुःखात असलेला कबीर सिंह दिसतो.

प्रीतीवर असलेल्या अतोनात प्रेमामुळे ब्रेकअप झाल्यावर कबीर सिंह ड्रग आणि दारू च्या आहारी जातो. ट्रेलरमध्ये कबीर सिंह च्या पात्राचे दोन्ही बाजू दाखवल्या आहेत.

ट्रेलरमध्ये कियारा आडवाणींना करण्यासारखे जास्त काही नाही. कबीर च्या आयुष्यात तिचे किती महत्व आहे हे ट्रेलरमधून आपल्याला दाखवले आहे.

कबीर चे हिंसक स्वभाव आणि प्रीती सोबत असतानाचे त्याचा प्रेमळ स्वभावाची दृश्ये आपल्याला ट्रेलरमध्ये एकामागोमाग एक दाखवले आहेत. ट्रेलरच्या शेवटी कबीर सिंह सांगतो की तो अविचारी विद्रोही नाही.

शाहिद कपूर यांनी उडता पंजाब (२०१६) मध्ये या प्रकारची रागीट स्वभावाची भूमिका साकारली होती. परंतु या चित्रपटात त्यांचा स्वभाव त्याहूनही जास्त रागीट आहे.

प्रेमभंग झालेला प्रेमी हे कथानक सलमान खान यांच्या तेरे नाम (२००३) मध्ये सुद्धा आपण पहिले होते. या चित्रपटात हे कथानक कशा पद्धतीने हाताळलंय हे लवकरच कळेल.

कबीर सिंह २१ जून २०१९ ला रिलीज होईल. खाली ट्रेलर पहा आणि तुम्ही चित्रपट पाहणार का ते आम्हाला कळवा.

Related topics

Trailer review