नाटककार मोहित टाकळकर या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.
मीडियम स्पायसी मध्ये सई ताम्हणकर आणि ललित प्रभाकर प्रमुख भूमिकेत
मुंबई - 13 May 2019 23:42 IST


Keyur Seta
सई ताम्हणकर आणि ललित प्रभाकर पहिल्यांदाच मराठी चित्रपटात एकत्र काम करणार आहेत. मीडियम स्पायसी असे या चित्रपटाचे शीर्षक आहे.
नाटककार मोहित टाकळकर पहिल्यांदाच चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. विधी कसलीवाल यांच्या लँडमार्क फिल्म्स या बॅनरखाली चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे.
निर्मात्यांनी त्यांच्या अधिकृत विधानात म्हटले, "जेवणात किती तिखट हवं हे प्रत्येकाच्या आवडीवर अवलंबून असतं मग जेवण बनवताना आपण सगळ्या पदार्थांचा योग्य बॅलन्स कसा साधायचा? आधुनिक काळातल्या नात्यामध्ये सुद्धा हा प्रश्न पडतो की नात्यांमध्ये बॅलन्स कसा साधावा?"

ताम्हणकर या चित्रपटात वेगळ्या अवतारात दिसतील असे निर्मात्यांनी सांगितले. प्रभाकर शहरी तरुणाच्या भूमिकेत दिसतील. याच वर्षी रिलीज झालेल्या आनंदी गोपाळ (२०१९) मधल्या उत्कृष्ट अभिनयासाठी प्रभाकरांचे सगळीकडे कौतुक केले गेले. तरुण अभिनेत्री पर्ण पेठे सुद्धा या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत आहेत.
कासलीवाल यांनी वजनदार (२०१६), रिंगण (२०१७), गच्ची (२०१७), पिप्सी (२०१८), रेडु (२०१८) आणि नशीबवान (२०१९) या चित्रपटांची निर्मिती केली आहे.
कासलीवाल म्हणाल्या की त्यांना मीडियम स्पायसी चे कथानक खूप आवडले आणि चित्रपट रिलीज झाल्यावर लोकांना सुद्धा हा चित्रपट तितकाच आवडेल अशी त्यांना आशा आहे.