News Hindi

अक्षय कुमार आणि कतरीना कैफ ९ वर्षानंतर रोहित शेट्टी यांच्या सूर्यवंशी मध्ये एकत्र


रोहित शेट्टी आणि कतरीना कैफ मात्र पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत.

Our Correspondent

तीस मार खां (२०१०) नंतर कतरीना कैफ अक्षय कुमार सोबत रोहित शेट्टी यांच्या सूर्यवंशी मध्ये काम करणार आहेत. रोहित शेट्टी यांच्या सिम्बा (२०१८) चित्रपटाच्या फ्रँचाइज चा हा चित्रपट भाग असेल.

निर्मात्यांनी नुकतेच सोशल मीडियावर दिग्दर्शक, प्रमुख कलाकार आणि निर्माता कारण जोहर यांचा एकत्र फोटो टाकून याची घोषणा केली.

'पोलिसांच्या या दुनियेत तुमचे स्वागत आहे,' असे लिहून अक्षय कुमारने इंस्टाग्रामवर हा फोटो शेर केला.

नमस्ते लंडन (२००७), सिंग इस किंग (२००८) आणि तीस मार खां (२०१०) या चित्रपटात अक्षय कुमार आणि कतरीना कैफ यांनी एकत्र काम केले आहे.

रणवीर सिंग यांची प्रमुख भूमिका असलेला २०१८ चा सुपरहिट चित्रपट सिम्बा चा सूर्यवंशी हा स्पिनऑफ असेल.

रोहित शेट्टी आणि कतरीना कैफ पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. ५ जून ला रिलीज होणाऱ्या सलमान खान यांच्या भारत मध्ये सुद्धा कतरीना कैफ यांची भूमिका आहे.

सूर्यवंशी पुढच्या वर्षी ईद ला रिलीज होणार आहे.

Related topics