News Marathi

'आईच्यान रं' गाण्यातून अभिनय बेर्डे आणि कश्मीर परदेशी यांच्या अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात


आपले नेहमीच्या सामान्य जीवनातल्या चिंता विसरून या झगमगी दुनियेत पाऊल टाकण्यास उत्सुक असलेल्या या मुलांच्या मनात काय चालू आहे हे गाण्याच्या शब्दांतून सांगितले आहे.

Keyur Seta

भारतामध्ये पालक नेहमी आपल्या मुलांना डॉक्टर किंवा इंजिनियर बनण्यास प्रोत्साहित करतात. परंतु रवी जाधवांच्या रंपाट मध्ये अभिनय बेर्डे यांच्या पात्राची आई मात्र त्याला अभिनेता होण्यास सांगत आहे. अभिनेता बनण्यासाठी खूप पैशांची आवश्यकता नसते त्यामुळेच आपल्या मुलाने अभिनेता व्हावे अशी आईची इच्छा आहे.

कश्मीरा परदेशी यांच्या पात्राला सुद्धा फक्त खूप पैसे कमवण्यासाठी अभिनेत्री व्हायचे आहे.

'आईच्यान रं' गाण्यातून या अभिनय बेर्डे आणि कश्मीरा परदेशी यांची चित्रपटात एंट्री होते असे वाटते. या गाण्यात दोन्ही कलाकारांनी आपले नृत्यकौशल्य दाखवले आहे. गाण्याचे नृत्य दिग्दर्शन देखील उत्तम आहे.

पुणे जंक्शन च्या सेट वर हे गाणे चित्रित केले आहे, त्यामुळे चित्रपटात पुणे शहरचा सुद्धा महत्वाचा भाग आहे असे म्हणायला हरकत नाही.

आपली नेहमीचे साधे आयुष्य मागे टाकून या झगमगी दुनियेत पाऊल टाकण्यास उत्सुक असलेल्या या मुलांच्या मनात काय चालू आहे हे गाण्याच्या शब्दांतून सांगितले आहे. दोघेही आपल्या स्वप्नांच्या दुनियेत असताना त्यांचे आवडते कलाकार अंकुश चौधरी आणि अमृता खानविलकर बरोबर नृत्य सुद्धा करतात.

बेला शेंडे आणि हर्षवर्धन वावरे दोघांनीही उत्तम गायन केले आहे. प्रोडक्शन डिजाइन सुद्धा चित्रपटाच्या फिल्मीपणाला शोभेल असे रंगीबेरंगी झाले आहे.

न्यूड (२०१८) नंतर रवी जाधव आता रंपाट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. रंपाट १७ मे ला प्रदर्शित होणार आहे. गाणे खाली पहा.

Related topics

Song review