{ Page-Title / Story-Title }

News Hindi

दे दे प्यार दे मधील 'मुखडा वेख के' गाणे: अजय, रकुल आणि तब्बू यांच्यातला प्रेमाचा त्रिकोण पाहायला मिळतो


ब्रिटिश संगीतकार मांज म्युजिक १९९९ साली रिलीज झालेल्या या पंजाबी गाण्याला अकिव अली च्या या चित्रपटात नवीन ढंगात सादर करतात.

Sonal Pandya

दे दे प्यार दे मधील 'मुखडा वेख के' या नवीन गाण्यात संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन वाईन पिताना दिसते. याचदरम्यान अजय देवगण, रकुल प्रीत सिंह आणि तब्बू यांच्या पात्रां मध्ये चाललेला रोमान्स पाहायला मिळतो.

दिवंगत गायक सुरजीत बिंद्राखिया यांचे १९९९ चे सुपरहिट गाणे 'मुखडा देख के' संगीतकार मांज म्युजिक ने नवीन ढंगात नव्या पिढीसमोर आणले आहे. गाण्यातले इलेकट्रोनिक बीट्स सुद्धा या नव्या पिढीची सांगीतिक आवड लक्षात घेऊन वापरले आहेत. जुन्या गाण्याचा रीमेक करण्याच्या ट्रेंड मध्ये हे अजून एक गाणे.

आपली पूर्व पत्नी (तब्बू) आणि नवीन गर्लफ्रेंड (रकुल प्रीत) यांच्यामध्ये फसलेले अजय देवगणच्या पात्राची व्यथा कुमार ने आपल्या शब्दात मांडली आहे. मिका सिंह आणि ध्वनी भानुशाली यांनी हे गाणे गायले आहे. पण त्यांचा आवाज कलाकारांना सूट होत नाही.

मिका सिंह यांचा आवाज अजय देवगण यांच्या पात्राला बिल्कुल सूट होत नाही तसेच भानुशाली यांचा आवाज देखील तब्बू यांना सूट होत नाही. गाण्यातली एक सकारात्मक गोष्ट म्हणजे ठेका धरायला लावणारे संगीत. त्याचमुळे तुम्हाला पुन्हा पुन्हा हे गाणे ऐकायची इच्छा होईल.

अकिव अली दिग्दर्शित दे दे प्यार दे १७ मे ला रिलीज होईल. गाणे खाली पहा.

Related topics

Song review