News Hindi

१९७० च्या दशकातले सलमान खान आणि कतरीना कैफ भारत च्या पोस्टरवर


अगोदरच्या पोस्टरवर दिशा पटनी दिसल्यानंतर या पोस्टरवर कतरीना कैफ झळकल्या आहेत.

Shriram Iyengar

भारत चे नवीन पोस्टर वर १९७० च्या काळात सलमान खान खोदकाम करणाऱ्या कारागिराच्या भूमिकेत दिसत आहेत तर कतरीना कैफ 'मॅडम सर' म्हणून दिसत आहेत. सलमान खान ने सोशल मीडियावर हे नवीन पोस्टर रिलीज केले.

सलमान खान यांना खोदकाम करणाऱ्या कारागिराच्या वेशात पाहून काला पत्थर (१९७९) चित्रपटातील अमिताभ बच्चन यांच्या भूमिकेची आठवण नक्कीच येईल.

पोस्टरवर कतरीना कैफ सुद्धा दिसतात. त्या सलमान खान यांच्या प्रेयसी ची भूमिका साकारत आहेत असे वाटते. पण सलमान खानने सोशल मीडियावर पोस्टर रिलीज करताना त्यांना 'मॅडम सर' या नावाने संबोधले. यावरून कतरीना कैफ चित्रपटात सलमान यांच्या वरिष्ठ अभियंताची भूमिका साकारत आहेत असे वाटते. त्यांच्या पेहरावावरून सुद्धा हेच वाटते.

अली अब्बास जफर दिग्दर्शित हा चित्रपट कोरियन चित्रपट एन ओड टू माय फादर (२०१४) चा अधिकृत रीमेक आहे. ५ जून ला हा चित्रपट रिलीज होईल.

Related topics

Poster review