News Hindi

सांड की आँख पोस्टर – तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकर वृद्ध शार्पशूटरस च्या भूमिकेत


तुषार हिरानंदानी दिग्दर्शित चित्रपटात या दोन्ही अभिनेत्री वयाची साठी पार केल्यानंतर शूटिंग च्या खेळात भाग घेऊन पदक जिंकून आणणाऱ्या दोन स्त्रियांची भूमिका साकारत आहेत.

Sonal Pandya

तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकर तुषार हिरानंदानी दिग्दर्शित सांड की आंख चित्रपटात दिसणार आहेत. २५ ऑक्टोबर ला हा चित्रपट प्रदर्शित होईल.

पन्नू आणि पेडणेकर चंद्रो तोमर आणि प्रकाशी तोमर या नणंद-वाहिनी जोडगोळीच्या भूमिका साकारत आहेत. त्या दोघीनीं वयाची साठी पार केल्यानंतर शूटिंग च्या खेळात भाग घ्यायला सुरवात केली आणि अनेक स्पर्धा जिंकल्या.

चंद्रो आणि प्रकाशी तोमर त्यांच्या परिसरात शूटर दादी आणि रिव्हॉल्व्हर दादी नावाने प्रसिद्ध आहेत.

पहिल्या पोस्टर मध्ये दोघीही शर्ट, घागरा आणि डोक्यावर पल्लू या पेहरावात दिसत आहेत. त्या मोठ्या अभिमानाने हातात पिस्तूल घेऊन उभ्या आहेत.

तन बूढ़ा होता है मन बूढ़ा नहीं होता अशी टॅगलाईन पोस्टरवर लिहली आहे. दुसऱ्या पोस्टर वर लिहले आहे, 'पिंजरा तोडून वयाची साठी पार केल्यानंतर ७०० मेडल्स जिंकून त्यांनी सगळीकडे हाहाकार केला'.

दोन्ही अभिनेत्रींना वयस्कर दाखवण्यासाठी प्रोस्थेटिक मेकअप चा वापर केला आहे, तरीसुद्धा त्यांचा चेहरा सहज ओळखता येतो. अशात हा प्रश्न पडतो की खऱ्या आयुष्यात वयाची साठी पार केलेल्या अभिनेत्रींनी या भूमिका साकारल्या असत्या तर? हिंदी चित्रपटसृष्टीत या वयोगटातल्या अनेक प्रतिभावान अभिनेत्री आहेत.

अनुराग कश्यप, निधी परमार आणि रिलायन्स एंटरटेनमेंट निर्मित सांड की आंख मध्ये प्रकाश झा आणि विनीत कुमार सिंह यांच्या सुद्धा महत्वाच्या भूमिका आहेत.

हिरानंदानी या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहेत. या अगोदर त्यांनी एक व्हिलन (२०१४) आणि हाफ गर्लफ्रेंड (२०१७) या चित्रपटांची पटकथा लिहली होती.

Related topics

Poster review