{ Page-Title / Story-Title }

News Hindi

सनी देओल ने भारतीय जनता पक्षात गेल्यानंतर म्हटले आजच्या तरुणाईला नरेंद्र मोदी सारख्या नेत्याची गरज आहे


सनी देओल म्हणाले की ते खूप मोठी मोठी आश्वासने देणार नाहीत तर खरोखर लोकांना मदत करणार.

शटरबग्स इमेजेस

Our Correspondent

दिग्गज अभिनेता सनी देओल ने अधिकृतरीत्या भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. रक्षा मंत्री निर्मला सीतारामन आणि रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत दिल्ली ला पत्रकार परिषद घेऊन याची घोषणा करण्यात आली.

वडील धर्मेंद्र आणि त्यांची पत्नी हेमा मालिनी यांच्या पावलावर पाऊल ठेवून आता सनी देओल सुद्धा राजकारणात उतरले आहेत. देओल ने नरेंद्र मोदींवर स्तुतीसुमने उधळली. "माझ्या वडिलांनी अटल बिहारी वाजपेयींना पाठिंबा दर्शवला होता आणि आता मी नरेंद्र मोदींना साथ द्यायला आलो आहे."

मोदीजींनी देशासाठी खूप काही केलं आहे. आणखी काही वर्षांसाठी तेच सत्तेत राहावे अशी माझी इच्छा आहे. तरुणाईला नरेंद्र मोदी सारख्या नेत्याची गरज आहे, असे ते म्हणाले.


ते म्हणाले की ते खूप मोठी मोठी आश्वासने देणार नाहीत तर खरोखर लोकांना मदत करणार.

सनी देओल गुरदासपूर विभागातून लोकसभेची निवडणूक लढवणार का यावर अजून तरी शिक्कमोर्तब झाली नाही. दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांनी या अगोदर गुरदासपूरमधून निवडणूक लढवली होती.

रक्षा मंत्री निर्मला सीतारामन यांनी देओल यांचे पक्षात स्वागत केले. बॉर्डर हा सनी देओल यांचा चित्रपट एक देशभक्ती जागवणारा चित्रपट होता असे त्या म्हणाल्या. "देओल आमच्या पक्षात येण्यास इच्छुक आहेत हे समजताच मला बॉर्डर चित्रपटाची आठवण झाली. देओल ने बॉर्डर मध्ये देशभक्ती ची भावना इतकी सुंदर अभिनीत केली आहे की प्रत्येक भारतीयाचे उर भरून येते," त्या म्हणाल्या.

सनी देओल यांचे वडील धर्मेंद्र राजस्थान च्या बिकानेर विभागाचे २००४ ते २००९ पर्यंत खासदार होते. हेमा मालिनी आता मथुरेच्या खासदार आहेत.

Related topics