News Hindi

आलिया भट्ट कलंक मध्ये अतिशय सुंदर आणि मनमोहक दिसत आहेत


पोस्टरवरून तरी असे वाटते की आलिया साकारत असलेली रूप ही राजघराण्यातून आहे.

Mayur Lookhar

आपल्या चित्रपटातील महिला पात्रांची ओळख करून देण्यासाठी महिला दिवसापेक्षा उत्तम दिवस कोणता असेल? कलंक चित्रपटातील सर्व पुरुष पात्रांचे पोस्टर्स रिलीज केल्यानंतर धर्मा प्रोडक्शन्स ने दुसऱ्याच दिवशी, म्हणजेच आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून, प्रमुख महिला पात्रांचे पोस्टर्स रिलीज केले.

त्यातले पहिले पोस्टर आहे आलीया भट्ट साकारत असलेल्या पात्राचे.

आलिया भट्ट रूप हे पात्र साकारत आहेत. पोस्टरवरून रूप ही राजघराण्यातली मुलगी आहे असे वाटते. पारंपरिक कपडे आणि दागिन्यांमध्ये त्या सुंदर दिसतात. त्या सोज्वळ दिसतात.

आलियाच्या पोस्टरमध्ये लाल रंगचा प्रामुख्याने वापर करण्यात आला आहे. वरुण धवन, संजय दत्त, आदित्य रॉय कपूर यांच्या पोस्टरमध्ये पण लाल रंगाचा वापर केला आहे.

आपल्या ट्वीटमध्ये आलिया ने त्यांच्या पात्राच्या नावाचा उल्लेख केला होता. चित्रपटात जफर ही भूमिका करत असलेले वरुण धवनच्या मते रूप प्रबळ इच्छाशक्ती असलेली धाडसी मुलगी आहे.

सोनाक्षी सिन्हा आणि माधुरी दीक्षित नेने यांच्या पात्रांचे पोस्टर्स देखील आज रिलीज केले जातील.

अभिषेक वर्मन दिग्दर्शित कलंक मध्ये वरुण धवन, संजय दत्त, माधुरी दीक्षित नेने, आदित्य रॉय कपूर या कलाकांरांची मांदियाळी आहे. १९ एप्रिल ला हा चित्रपट रिलीज होईल.

Related topics

Poster review