News Hindi

अधिकृत बातमी – वडील डेविड धवन दिग्दर्शित कुली नं १ च्या रीमेक मध्ये वरुण धवन झळकणार

Read in: English | Hindi


डेविड धवन दिग्दर्शन करत असलेल्या या चित्रपटासाठी कोणत्या अभिनेत्रीची निवड केली आहे हे मात्र वरुण ने अजून स्पष्ट केले नाही.

फोटो- शटरबग्स इमेज.

Our Correspondent

वरुण धवन ने नुकतेच स्पष्ट केले की ते वडील डेविड धवन दिग्दर्शित गोविंदाची प्रमुख भूमिका असलेल्या कुली नं १ च्या रीमेक मध्ये काम करणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुद्धा डेविडच करणार आहेत.

वरुण धवन या चित्रपटात काम करत असल्याची उडती खबर होती, परंतु त्याच्या सत्यतेबद्दल साशंकता होती.

बीबीसी शी चर्चा करत असताना वरुण धवन ने याची पुष्टी केली. "मी कुली नं १ मध्ये काम करणार आहे. मी या बातमीची पुष्टी करू का नको या बाबत मी थोडा साशंक होतो, परंतु आता इतक्या ठिकाणी याबद्दल बातम्या आल्या आहेत," असं धवन म्हणाले.

चित्रपटात आलीया भट्ट सुद्धा आहेत का असं विचारल्यावर ते हसत म्हणाले, "मी प्रत्येक चित्रपट आलिया बरोबरच करू शकत नाही."

चित्रपटातील प्रमुख अभिनेत्री बद्दल विचारले असता ते म्हणाले, "तुम्हाला लवकरच कळेल, मी आता तुम्हाला या बाबत काही सांगू शकत नाही. आलीया आणि मी या चित्रपटात एकत्र काम नाही करत आहोत. आम्ही प्रेक्षकांना थोडी विश्रांती देत आहोत कारण आम्ही एकत्र काम करत आहोत यात सध्या काही नवल राहिले नाही."

आपल्या वडिलांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाच्या रीमेक मध्ये काम करण्याची वरुणची ही पहिली वेळ नाही. या अगोदर सुद्धा त्यांनी जुडवा (१९९७) च्या रीमेक जुडवा २ (२०१७) मध्ये काम केले आहे. जुडवा २ चे दिग्दर्शन सुद्धा डेविड धवन यांनीच केले होते.

कुली नं १ हा एक विनोदी चित्रपट होता ज्यात करिष्मा कपूर, कादर खान, सदाशिव अमरापूरकर आणि हरीश यांच्या सुद्धा महत्वाच्या भूमिका होत्या. आपल्याला आवडणाऱ्या मुलीशी लग्न करण्यासाठी एक कुली आपण मोठा उद्योगपती असल्याचं नाटक करतो, अशी चित्रपटाची कथा आहे.

Related topics