स्कायफायर ही वेब-सिरीज लेखक अरुण रामन यांच्या २०१६ मधल्या त्याच नावाच्या कादंबरीवर आधारित आहे.
सोनल चौहान प्रतीक बब्बर बरोबर झी५ च्या स्कायफायर या वेब-सिरीज मध्ये काम करण्यास उत्सुक
Mumbai - 08 Mar 2019 1:48 IST


Mayur Lookhar
अभिनेत्री सोनल चौहान म्हणाल्या की त्या स्कायफायर या अत्यंत वेगळ्या धाटणीच्या वेब-सिरीज मध्ये अभिनय करण्यास उत्सुक आहेत.
झी एंटरटेनमेंट एन्टरप्राईज चे झी५ लवकरच स्कायफायर ही वेब-सिरीज सुरु करणार आहे. या वेब-सिरीज मध्ये प्रतीक बब्बर, जतीन गोस्वामी आणि जिषु सेनगुप्ता यांच्या प्रमुख भूमिका आहेत. व्हाय चीट इंडिया (२०१९) फेम दिग्दर्शक सौमिक सेन या वेब-सीरीजचे दिग्दर्शन करणार आहेत.
आमच्याशी बोलताना चौहान म्हणाल्या, "हो, मी एक नवीन वेब-सिरीज करत आहे, हा खूप इंटरेस्टिंग प्रोजेक्ट आहे. माझ्या मते भारतीय चित्रपटां मध्ये आणि वेब-सिरीज मध्ये हा विषय या अगोदर हाताळण्यात आला नाही. भारतीय वेब-सीरिजच्या विश्वात आता नवीन विषय हाताळले जात आहेत. आणि हा सुद्धा एक अत्यंत वेगळा विषय आहे. मी यासाठी खूपच उत्सुक आहे."
स्कायफायर ही वेब-सिरीज लेखक अरुण रामन यांच्या २०१६ मधल्या त्याच नावाच्या कादंबरीवर आधारित आहे. पुस्तकामध्ये पत्रकार चंद्रशेखर, इतिहासकार मीनाक्षी पीरजादा आणि गुप्तहेर खात्याचे अधिकारी सय्यद अली हसन हे तिघे दिल्लीतल्या एका झोपडपट्टीतल्या मुलांच्या अपहरणाचा तिढा सोडवण्याचा प्रयत्न करत असतात.
सुरेश नायर यांनी पुस्तकावर आधारित नवीन पटकथा लिहली आहे. नायर हे अनुभवी पटकथाकार आहेत. या अगोदर त्यांनी कहानी (२०१२), एअरलिफ्ट (२०१६), तीन (२०१६) आणि कहानी २ (२०१७) चित्रपटांवर काम केले आहे.
एकांत बाबानी, सत्या महापात्रा, ऍलीगेटर प्रोडक्शन्स आणि शबीना खान प्रोडक्शन्स यांनी मिळून या सिरीज ची सह-निर्मिती केली आहे. ऍलीगेटर ने या अगोदर हंगामा डिजिटल साठी डॅमेज या वेब-सिरीजची निर्मिती केली होती.
एका प्रोडक्शन युनिट मेम्बरच्या मते या सिरीजच्या व्हिज्युअल इफेक्ट्स साठी नावाजलेला स्टुडिओ काम करत असल्यामुळे सिरीजमध्ये आपल्याला उच्च प्रतीचे व्हिज्युअल इफेक्ट्स पाहायला मिळतील.
या वर्षी उन्हाळ्यातच ही सिरीज लॉन्च करण्याचा निर्मात्यांचा विचार आहे.