News Hindi

कलंक च्या फर्स्ट लुक मध्ये वरुण धवनचा गंभीर अंदाज


सोशल मीडिया वरून वरुण धवन चा फर्स्ट लुक रिलीज केला.

Shriram Iyengar

अभिषेक वर्मन दिग्दर्शित स्वातंत्र्य पूर्व काळामध्ये घडणारा कलंक चित्रपटातील वरुण धवन यांच्या पात्राचा फर्स्ट लुक रिलीज करण्यात आला आहे.

चित्रपटात वरुण धवन, आलिया भट्ट यांच्या सहित माधुरी दीक्षित, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा आणि आदित्य रॉय कपूर यांच्या सुद्धा भूमिका आहेत.

धवन ने सोशल मीडिया वरून आपल्या पात्राचा फर्स्ट लुक रिलीज केला. "हे अविस्मरणीय पात्र निभावण्याचा अनुभव देखील तितकाच अविस्मरयनीय होता, तर मित्रांनो भेटा जफर ला."

कारण जोहर ने चित्रपटातील दृश्याचा एक फोटो शेर केल्याच्या काही तासां नंतरच हा लुक रिलीज करण्यात आला. त्या फोटो मध्ये आलिया आणि धवन एका छोट्या बोटीत पाठमोरे बसलेले दिसत आहेत.

धवनच्या या नवीन फोटो मध्ये १९४० च्या दशकात स्वातंत्र्य पूर्व भारतातल्या तरुणाचा गंभीर अंदाज दिसून येतो. डोळ्यातले काजळ आणि लालभडक बॅकग्राऊंड यामुळे हे पोस्टर आणखी जास्त उठून दिसते.

१९४० च्या दशकात भारताच्या फाळणीच्या चळवळी मध्ये या चित्रपटाची कथा घडते. चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक वर्मन यांनी केले असून चित्रपटाची निर्मिती करण जोहर, साजिद नाडियाडवाला, अपूर्व मेहता आणि हिरु यश जोहर यांनी केली आहे.

फॉक्स स्टार्स हे या चित्रपटाचे सह-निर्माते आहेत. कलंक १९ एप्रिल ला चित्रपटगृहां मध्ये रिलीज होईल.

Related topics

Poster review