News Hindi

गायक-संगीतकार हार्डी संधू ८३ मध्ये मदन लाल यांची भूमिका साकारणार आहेत


ते या अगोदर मदन लाल यांच्या हाता खाली प्रोफेशनली क्रिकेट खेळले आहेत.

Our Correspondent

गायक-संगीतकार हार्डी संधू यांची निवड कबीर खान दिग्दर्शित ८३ चित्रपटामध्ये माजी भारतीय द्रुतगती गोलंदाज मदन लाल यांच्या भूमिके साठी करण्यात आली आहे.

हे त्यांचे अभिनय क्षेत्रातील पदार्पण असेल. भारतीय क्रिकेट टीम च्या १९८३ विश्वविजेत्या होण्याच्या प्रवासावर हा चित्रपट आधारित आहे. चित्रपटात रणवीर सिंह कपिल देवच्या प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

संधू स्वतः भारताच्या अंडर-१९ टीम मध्ये होते आणि ते रणजी ट्रॉफी सुद्धा खेळले आहेत. योगायोग म्हणजे मदन लाल त्यांचे त्यावेळी कोच होते.

"त्यावेळी ते माझे कोच होते. चित्रपटासाठी निवड झाल्यानंतर माझे त्यांच्याशी बोलणे झाले होते, आता एक-दोन दिवसात मी त्यांना भेटेन," असं संधू म्हणाले.

"आपले पात्र अंगीकृत करण्यासाठी संधू मोठ्या स्क्रीनवर मदन लाल यांचे विडीओ पाहत आणि त्यांना कॉपी करण्याचा प्रयत्न करत," असं निर्माते एका अधिकृत विधानात म्हणाले.

याच चित्रपटात बलविंदर सिंग ची भूमिका साकारणारे अमी वर्क यांनी हार्डी संधू चे नाव सुचवले होते. संधू म्हणाले, "अमी आणि त्यांना मदत करणारे आणखी एक कोच या दोघांनी माझे नाव सुचवले. मी अंडर-१९ टीम साठी आणि रणजी ट्रॉफी मध्ये  खेळलो आहे. कबीर सरांनी शेवटचा निर्णय घेण्या अगोदर मला तयारी करायला सात दिवस दिले."

मदन लाल यांनी वेस्ट इंडिज विरुद्ध असलेल्या १९८३ वर्ल्ड कप फायनल मध्ये बॅट आणि बॉल ने महत्वाची भूमिका वाजवली होती. त्यांनी विव रिचर्ड्स सहित तीन अतिशय महत्वाचे विकेट्स घेतले आणि १७ रन्स सुद्धा केले ज्यात एका सिक्स चा समावेश होता.

Related topics