{ Page-Title / Story-Title }

News Hindi

वेब-सिरीज पदार्पणा बाबत बोलताना अक्षय कुमार म्हणाले माझ्या मुलाची इच्छा होती मी डिजिटल क्षेत्रात सुद्धा काम करावे


एमॅझॉन प्राइम ने एका थरारक ऍक्शन सिरीज साठी अक्षय कुमार यांना साइन केले आहे.

Keyur Seta

आता एमॅझॉन प्राइम ने एका थरारक ऍक्शन सिरीज साठी अक्षय कुमार यांना साइन केले आहे. प्राइम निर्मित एका थरारक ऍक्शन सिरीज मध्ये काम करणार आहेत ही बातमी ऐकून अक्षय कुमारचे चाहते नक्कीच खुश झाले असतील.

मुंबई मध्ये पार पडलेलया एका समारंभात अक्षय कुमार ने ही घोषणा केली. यावेळी तिथे एमॅझॉन प्राइम चे काही प्रमुख अधिकारी सुद्धा उपस्थित होते.

अक्षय कुमार ने सांगितले की त्यांचा मुलगा आरव ने त्यांना वेब-सिरीज मध्ये काम करण्यास प्रेरित केले. "तो म्हणाला 'डॅड, तुम्ही आता डिजिटल क्षेत्रात पदार्पण करायलाच पाहिजे' आणि  तरुण वर्गाचे म्हणणे ऐकायलाच हवे. तो माझा गुरु आहे, मी या बाबतीत त्याच्या कडूनच शिकलो. अशा प्रकारे मी या क्षेत्रात उडी घायचे ठरवले. आणि त्यासाठी एमॅझॉन पेक्षा उत्तम पर्याय असूच शकत नाही."

शो बद्दल विचारल्यावर अक्षय कुमार म्हणाले, "सिरीज मध्ये खूप ऍक्शन असले तरीही ही मानवी भावभावनांची गोष्ट आहे. ही एक काल्पनिक कथा आहे. साहजिकच मी यापेक्षा जास्त नाही बोलू शकत पण तुमचे खूप मनोरंजन होईल हे नक्की."

मुंबईच्या रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब मध्ये अक्षय कुमार ने स्वतःच्या सूटला आग लावून स्टायलिश एंट्री मारली. यावरूनच वाचकांना या सिरीज मध्ये किती थरारक ऍक्शन असणार आहे याचा अंदाज येऊ शकतो.

जेनिफर सालके, एमॅझॉन स्टुडिओज च्या विश्वस्तरीय प्रमुख, यांनी अक्षय कुमार या प्रोजेक्ट शी जोडले गेल्याबद्दल आनंद व्यक्त केला. त्या म्हणाल्या, "एमॅझॉन साठी जगभरातल्या प्रेक्षकांना १ तास पूर्ण मनोरंजन करेल अशी ऍक्शन ने भरपूर सिरीज द्यायची आहे. आणि या थरारक गोष्टींमध्ये अक्षय कुमार सारखा एक सुप्रसिद्ध अभिनेता काम करतोय हे स्वप्नवत आहे."

वेब-सिरीज ची सह-निर्मिती अबंडंटिया यांनी केली ज्यांनी या अगोदर आर माधवन ची प्रमुख भूमिका असलेली ब्रीथ या वेब-सिरीज ची सह-निर्मिती केली होती.

दि एन्ड असे या वेब-सिरीजचे तात्पुरते शीर्षक ठेवण्यात आले आहे. दिग्दर्शक आणि इतर कलाकारांची नावे अजून घोषित करण्यात आली नाहीत.

Related topics

Amazon Prime Video