{ Page-Title / Story-Title }

News Marathi

वेडिंग चा शिनेमा चित्रपटातल्या 'बोल पक्या बोल' या रोमँटिक गाण्यात अवधूत गुप्ते आपली जादू दाखवतात


शिवराज वायचळ आणि ऋचा इनामदार यांच्यावर गाणे चित्रित केले गेलेले आहे.

Keyur Seta

पहिल्यांदाच दिग्दर्शनाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या सलील कुलकर्णींच्या वेडिंग चा शिनेमा चित्रपटात मुक्ता बर्वे, भाऊ कदम, शिवाजी साटम यांसारखे अनुभवी कलाकार आहेत. पण 'बोल पक्या बोल' या पहिल्या गाण्यात शिवराज वायचळ आणि ऋचा इनामदार हे नवखे चेहरे दिसत आहेत. आपले प्रेम व्यक्त न करू शकणाऱ्या मुला बद्दल हे गाणे आहे.

हे एक मनोरंजक रोमँटिक गाणे आहे. इनामदार एक डॉक्टर आहेत त्यामुळे त्या गावातल्या हॉस्पिटल मध्येच दिसतात. वायचळ तिच्या भोवती घुटमळत आहे पण तिच्याजवळ जाऊन आपलं प्रेम व्यक्त करण्याची त्याच्यात हिम्मत नाही.

चित्रपटात हे गाणे प्रवीण तरडे यांच्या पात्राने गायले आहे जे पक्याला आपले प्रेम व्यक्त करण्यास प्रोत्साहित करत आहेत. हॉस्पिटल मध्ये डान्सचे दृश्य दाखवणे तसे विचित्र वाटू शकते पण वाटत नाही कारण गाण्याचे चित्रीकरण मुन्नाभाई एम बी बी एस (२००३) सारखे अगदी साध्या पद्धतीने केलेले आहे.

गाण्याची धून खूप साधी सरळ आहे, गाण्यात उगाचच काही वेगळं करण्याचा मोह आवरला आहे. अवधूत गुप्ते यांनी त्यांच्या आवाजाच्या जादूने गाण्यात अजून मजा आणली आहे.

वायचळ यांनी अगं बाई अरेच्या २ (२०१५), फुंतरू (२०१६) या चित्रपटातून आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे तर ऋचा इनामदार यांनी स्वप्नील जोशी यांच्या भिकारी (२०१७) या चित्रपट अभिनय केला आहे.

गाणे इकडे पहा.

Related topics

Song review