{ Page-Title / Story-Title }

News Marathi

रॉकी ट्रेलर – संदीप साळवे यांची प्रमुख भूमिका असलेला टिपिकल एक्शन मसालापट


अगदी कमी शब्दात सांगायचं तर हा एक टिपिकल एक्शनपट आहे ज्यात शेवटी काय होणार हे तुम्हाला अगोदरच ठाऊक असते.

Keyur Seta

रॉकी नावा प्रमाणे संदीप साळवे अभिनयीत या चित्रपटात देखील काही नावीन्य नाही.

टीव्ही वर अनेक हिंदी चॅनेल्सवर आपण हिंदीत डब केलेले दक्षिण भारतीय चित्रपट पाहतो. बहुतेक चित्रपटांची कथा सारखीच असते. एक हिरो असतो जो वाईट प्रवृत्तीच्या गुंडां विरुद्ध लढतो आणि शेवटी जिंकतो.

अदनान शेख यांचा रॉकी सुद्धा याच पठडीतला सिनेमा आहे असे वाटते.

हिरोचे शरीर पिळदार आहे आणि तो एका मुलीच्या प्रेमात पडला आहे. त्याला अन्याय सहन होत नाही, त्यामुळे त्याच्या आयुष्यात एक घटना घडते. आता त्याचा सामना होतो नाना (राहुल देव) या एका वाईट राजकारण्याशी.

अगदी सोप्या शब्दत सांगायचे म्हणजे ट्रेलर मध्ये टिपिकल फायटिंगची दृश्ये आहेत. चित्रपटाचा शेवट काय असणार यात काही नवल नाही.

ट्रेलर मध्ये आपल्याला संतोष जुवेकर, क्रांती रेडकर आणि यतीन कार्येकर यांच्या सारखे मराठीतले काही ओळखीचे चेहरे दिसतात.

दिग्दर्शक अदनान शेख हे सुपरहिट हिंदी चित्रपट बाघी २ (२०१८) वर सहाय्यक दिग्दर्शक होते.

रॉकी ८ मार्च २०१९ ला रिलीज होईल. ट्रेलर इकडे पहा.

Related topics

Trailer review