{ Page-Title / Story-Title }

News Marathi

फायरब्रॅण्ड – उषा जाधव यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट आधुनिक समाजातल्या नातेसंबंधांवर भाष्य करतो


अरुणा राजे दिग्दर्शित या चित्रपटात घटस्फोटाच्या केस हाताळणाऱ्या महिला वकिलाची कथा दाखवली आहे.

Suparna Thombare

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक अरुणा राजे यांच्या फायरब्रॅण्ड चित्रपटात आधुनिक काळातल्या नातेसंबंधांची गुंतागुंत आणि बदलत्या काळानुसार स्त्री आणि पुरुषांची समाजातली बदलणारी भूमिका यावर भाष्य केले आहे.

चित्रपटाची कथा उषा जाधव, ज्या एक घटस्फोट स्पेशालिस्ट वकील आहेत, यांच्या भोवती फिरते. त्यांच्या यशामुळे सहकर्मचारी, खासकरून काही पुरुष वकिलांमध्ये, इर्षेची भावना निर्माण होते.

उषा जाधवने एक दलित, बलात्काराचे शिकार झालेल्या स्त्रीची भूमिका साकारली आहे. त्यांच्याकडे एका श्रीमंत जोडप्याच्या घटस्फोटाची केस येते. राजेश्वरी सचदेव आणि सचिन खेडेकर यांनी त्या जोडप्याची भूमिका केली आहे.

वकीलांच्या स्वतःच्या लग्नात देखील काही प्रॉब्लेम्स आहेत. गिरीश कुलकर्णी यांनी जाधवच्या पतीची भूमिका केली आहे.

ट्रेलरमध्ये एका महत्वाच्या विषयाला वाचा फोडली आहे. परंतू पात्रांमधले संभाषण थोडे कृत्रिम वाटते. एकूणच ट्रेलरमध्ये स्त्री आणि पुरुष नातेसंबंधांवरील संवाद कमी असायला हवे होते आणि डबिंग सुद्धा साधारणच आहे.

उत्तम कलाकार आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक असल्यामुळे चित्रपटात आपल्याला विचार करण्यास भाग पडतील अश्या अनेक गोष्टी असतील ही आशा आहे.

प्रियंका चोपडा यांच्या पर्पल पेबल पिक्चर्स या बॅनर खाली बनलेला हा पहिलाच नेटफ्लिक्स ओरिजिनल चित्रपट आहे. २२ फेब्रुवारी पासून नेटफ्लिक्स वर हा चित्रपट उपलब्ध झाला. ट्रेलर खाली पहा.

Related topics

Trailer review Netflix