News Marathi

रवी जाधवांचा रंपाट हा मनोरंजनात्मक चित्रपट असणार आहे – टीजर पहा

Read in: English


न्यूड (२०१८) च्या दिग्दर्शकाचा हा नवीन चित्रपट स्टार्स होण्याची स्वप्न पाहणाऱ्या दोन मुलांची गोष्ट सांगतो.

Keyur Seta

आपल्या प्रत्येक नवीन चित्रपटामध्ये वेगळा विषय हाताळण्याच्या सवयीशी अबाधित राहत रवी जाधव न्यूड (२०१८) नंतर पुन्हा एक नवीन विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.

रंपाट हे चित्रपटाचे शीर्षक आहे. टीजर पाहून इतकाच अंदाज लावता येतो की हा एक पूर्णपणे मनोरंजनात्मक चित्रपट असणार आहे.

फिल्म स्टार्स होण्याची स्वप्न पाहणाऱ्या काही तरुण मुलांची ही गोष्ट आहे. पण टीजर मध्ये आपल्याला त्यांचे चेहरे दिसत नाहीत. कॅमेरा समोर पाठमोरे उभे राहून ते डान्स करत आहेत. अभिनय बेर्डे सुद्धा या चित्रपटात आहेत अशी बातमी आहे पण कलाकारांची नावे घोषित केल्यावरच आपल्याला याची खात्रीदायक माहिती मिळेल.

चेक्स चे शर्ट घालून स्टेजवर डान्स करतानाचे दृश्य पाहून तुम्हाला फराह खान दिग्दर्शित ओम शांती ओम (२००७) मधल्या शाहरुख खानच्या बाटली अवॉर्ड्स सीनची आठवण नक्कीच येईल.

झोया अख्तर यांच्या गली बॉय (२०१९) मधून आपल्याला रॅपचा पुरेपूर डोस मिळाला आहे आणि आता रंपाट च्या टीजर मध्ये सुद्धा आपल्याला मराठी रॅप ऐकायला भेटते. झी स्टुडिओज आणि अथांश कम्युनिकेशन ची निर्मिती असलेला रंपाट २६ एप्रिल ला रिलीज होईल.

खाली टीजर पहा आणि तुम्ही चित्रपट पाहायला उत्सुक आहात का ते आम्हाला कळवा.

Related topics

Teaser review