हल्लीच नावारूपाला येणारे गायक रोमी खान यांचे हे अजून एक जबरदस्त गाणे आहे.
केसरी मधील 'सानू केह्न्दी' गाण्यामध्ये नजर खिळवून ठेवण्यास मजबूर करणारे अक्षय कुमार यांचे नृत्य
Mumbai - 04 Mar 2019 4:52 IST


Mayur Lookhar
२१ सैनिक एका सीमा क्षेत्राची निगराणी करत आहेत जिथे १०,००० अफगाणी सैनिक हल्ला करणार आहेत. आता तुम्ही विचाराल की इथे नाचगाणे करायला वेळ कसा मिळेल?
हल्ल्याच्या अगोदर तर नक्कीच याचा वेळ आहे. त्यामुळे आता निर्मात्यांनी 'सानू केह्न्दी' हे केसरी मधील गाणे रिलीज केले आहे. गाण्याचे शब्द पंजाबी भाषेत आहेत म्हणून पंजाबी न समजणाऱ्या लोकांसाठी थोडी निराशेची बाब आहे परंतु जर चित्रपटात २१ पंजाबी सैनिक एकत्र येऊन गाणे गात आहेत तर साहजिकच ते त्यांची मातृभाषा म्हणजे पंजाबीतच गाणे गाणार ना.
असे वाटते अफगाणी सैनिक हमला करण्याच्या अगोदर हे गाणे दाखवले आहे. कुमार यांनी लिहलेले हे गाणे आपल्या कुटुंबापासून दूर असणाऱ्या सैनिकांवर बेतले आहे.
गाण्याच्या सुरुवातीला एक उदास बसलेला सैनिक एक उदास धून वाजवत आहे. हवलदार इशार सिंह (अक्षय कुमार) या उदास वातावरणाला एक मजेदार उत्साही वातावरणात बदलतात. सर्व सैनिक एकत्र येऊन नाचू लागतात.
गाणे पंजाबीत असल्यामुळे पंजाबी समजणारी लोकं हे गाणे अधिक एन्जॉय करू शकतात, पण गाण्याचे संगीत आणि चित्रीकरणामुळे गाणे पाहण्यालायक झाले आहे. अक्षय कुमारच्या अजब डान्स स्टेप्स आणि विचित्र हावभावांमुळे हे गाणे अधिक मजेशीर बनले आहे.
गाण्यातील दृश्ये मजेदार आहेत आणि त्यांना मजेदार बनवण्यात हातभार लावला आहे तनिष्क बागची यांच्या संगीताने. आणि एक सुखद धक्का म्हणजे हे गाणे रीमिक्स नाही.
गायक रोमी खान यांनी या गाण्यामध्ये अजून एक जबरदस्त परफॉर्मन्स दिला आहे. ब्रिजेश शांडिल्य यांची त्यांना योग्य साथ लाभली आहे. खान यांनी अक्षय कुमार यांना आवाज दिला आहे परंतु अंतऱ्यामध्ये ही जबाबदारी शांडिल्य वर सोपवली गेली आहे.
चित्रपटाचा ट्रेलर उत्तमच होता आणि आता हे गाणे सुद्धा छान झाले आहे. खाली हे मजेशीर गाणे पहा आणि आम्हाला कळवा की चित्रपट पाहायला तुम्ही उत्सुक आहात का? हा चित्रपट २१ मार्च ला रिलीज होईल.